• Talk To Astrologers
  • AstroSage Brihat Horoscope
  • Ask A Question
  • Raj Yoga Report
  • Child Report

मंगळाचे मेष राशीमध्ये संक्रमण आणि प्रभावी उपाय (24 डिसेंबर, 2020)

मंगळ ग्रह 24 डिसेंबर ला दुपारी 11:42 वाजता आपला मित्र बृहस्पतीचे मीन राशीमधून निघून आपल्याच राशीमध्ये प्रवेश करेल. मेष राशी मंगळाच्या अधिपत्याची राशी आहे आणि अग्नी तत्व राशी आहे तसेच, मंगळ स्वतः एक अग्नी तत्व प्रधान ग्रह आहे. या प्रकारे अग्नी तत्व प्रधान ग्रहाचे संक्रमण शिग्र परिणाम देणारे सिद्ध होईल आणि देश आणि जगातील विभिन्न क्षेत्रात गती येईल. हे क्षेत्र ही असू शकतात आणि वाईट ही असू शकतात कारण, विभिन्न राशींवर मंगळाच्या संक्रमणाचा वेगवेगळा प्रभाव दिसेल.

मंगळ ग्रहाला देवतांचा सेनापती म्हटले गेले आहे आणि त्यांचे अधिपत्य मध्ये मेष तसेच वृश्चिक राशी येते. हे कर्क राशीमध्ये नीच अवस्थेत तसेच मकर राशीमध्ये उच्च अवस्थेत मानले जाते. सूर्य बृहस्पती आणि चंद्र देवाचे मित्र आहे. मंगळ ग्रहाचे नक्षत्र मृगशिरा, धनिष्ठा आणि चित्रा आहे.

हा एक उग्र ग्रह आहे आणि कुंडलीच्या प्रथम, चतुर्थ, सप्तम, अष्टम आणि द्वादश भावात मंगळाची स्थिती मांगलिक दोष उत्पन्न करते. मंगळ आपल्या संक्रमण काळात शीघ्र फळ देणारा ग्रह मानला जातो. चला तर मग जाणून घेऊया की, मंगळाचे मेष राशी मधील संक्रमणाचे फळ सर्व बारा राशीतील लोकांना कश्या प्रकारे प्रभावित करत आहे.

काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा

हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि

मेष राशि

मंगळ ग्रहाचे प्रत्येक संक्रमण तुमच्या जीवनात महत्वाचे स्थान ठेवते कारण, हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. याच्या वेतेरिक्त हा आपल्या आठव्या भाववर अधिकार ठेवतो. प्रथम भाव तुमचे चारित्रिक विशेषता, शारीरिक रूप रंग, गठन आणि उत्तम शरीराविषयी दर्शवतो. या भावमध्ये आपल्या मस्तिष्क आणि हुशारीविषयी देखील माहिती भेटते.

अष्टम भाव अनिश्चिततेने भरलेला भाव आहे, कारण हा भाव जीवनात होणारे अचानक परिवर्तने दर्शवतो. मंगळ ग्रहाचे संक्रमण आपल्याच राशीमध्ये म्हणजेच आपल्या प्रथम भावात होईल. मंगळाचे प्रथम भावमध्ये संक्रमण सहसा शुभ नाही मानले जाते परंतु, मंगळ आपल्या राशीमध्ये असल्यामुळे काही शुभ फळ नक्कीच प्रदान करेल.

मंगळाच्या या संक्रमण परिणाम स्वरूप आपल्या व्यवहारात बदल दिसूल येईल आणि आपल्यात कोणतेही कार्य करण्यासाठी घाई दिसून येईल. ही घाई भरपूर वेळी आपल्याला अडचणीत पाडू शकते आणि काही अशा स्थिती देखील निर्माण होईल ज्यामुळे आपल्याला पाश्च्याताप होईल, यासाठी धैर्याचा परिचय देणे आवश्यक राहील. आपण आणि आपल्या जीवनसाथीमध्ये दांपत्य जीवनात काही समस्या येऊ शकता, या समस्यांचे कारण आपला व्यवहार असू शकतो, यामुळे आपल्याला याकडे देखील विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

या काळात आपला स्वभाव थोडा हट्टी आणि आपली गोष्ट मान्य करायला लावणारा बनू शकतो, हे काही लोकांना आवडणार नाही. या संक्रमणाच्या प्रभावामुळे कौटुंबिक जीवनात तणाव दिसून येईल, परंतु आपल्याला संपत्ती संबंधित चांगला लाभ देखील या काळात होऊ शकतो. या संक्रमण काळात आपल्याला आरोग्याची समस्या येऊ शकते, विशेषतः ताप किंवा डोके दुखी सारखी समस्या आपल्याला त्रास देऊ शकते.

उपायः आपल्याला मंगळ ग्रहाचे शुभ प्रभाव प्रप्त करण्यासाठी मंगळाचा मंत्र “ॐ अं अंगारकाय नमः" मंगळवारी चालू करून दररोज जप करा

आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा

वृषभ राशि

मंगळ ग्रह आपल्या राशीसाठी सातव्या आणि बाराव्या भावचा स्वामी आहे. सातवा भाव आपल्यासाठी दीर्घकालीन भागीदाराचा भाव आहे. यामुळे विभिन्न प्रकारचा व्यापार, आयात-निर्यात अर्थात इम्पोर्ट एक्सपोर्ट, समाजात तुमच्या प्रतिमेवर अर्थात पब्लिक इमेज, विवाह आणि जीवनसाथीच्या बाबतीत माहिती होते तसेच बारावा भाव खर्चाचा भाव, जेल यात्रा भाव, हॉस्पिटल चा भाव, विदेशचा भाव मानले जाते. मंगळ ग्रहाचे संक्रमण तुमच्या राशीच्या बाराव्या भावात होईल. या भावात मंगळाचे संक्रमण अधिक अनुकूल मानले जात नाही. अश्यात तुम्हाला या संक्रमणाचे मिश्रित परिणाम प्राप्त होतील.

मंगळाच्या या संक्रमणाच्या परिणाम स्वरूप तुमच्या खर्चात वाढ पाहिली जाऊ शकते. हे खर्च काही अनावश्यक कार्यात ही होतील यामुळे तुमची चिंता वाढू शकते. तुम्हाला मानसिक तणाव ही वाटेल. या काळात तुमचे परदेशात जाण्याचे योग बनू शकतात आणि या सुदूर यात्रेवर जाण्यास तुम्हाला अधिक धन ही खर्च करावे लागू शकते म्हणून, आधीच तयारी करून ठेवा. या काळात तुम्ही आपल्या विरोधींना अजिबात घाबरणार नाही तर, त्यांचा सामना कराल आणि ते कमजोर राहतील.

हे संक्रमण तुमच्या लहान भाऊ बहिणींसाठी उपयुक्त सांगितले जाऊ शकत नाही अश्यात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल. या काळात तुम्ही आपल्या उधार आणि कर्जाच्या प्रति बरेच चिंतेत असाल आणि त्याला लवकरात लवकर चुकवण्याचा प्रयत्न कराल.

मंगळाचे हे संक्रमण तुमच्या दांपत्य जीवनाच्या दृष्टिकोनाने शुभ सांगितले जाऊ शकत नाही कारण, या काळात तुमच्या जीवनसाथी आणि तुमच्या मध्ये तणाव वाढण्याची शक्यता राहील. जीवनसाथीचा व्यवहार ही रागात असेल आणि लहान गोष्टींवर ही राग व्यक्त करतील यामुळे तुमच्या नात्यामध्ये चिंता वाढलेली राहील.

उपायः मंगळ ग्रहांचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मंगळवारी बजरंगबली ला गोड पान अर्पित केले पाहिजे.

वृषभ मासिक राशिभविष्य

मिथुन राशि

मंगळ ग्रहाचे संक्रमण तुमच्या राशीच्या एकादश भावात होईल. हे तुमच्या कुंडलीच्या एकादश भाव तसेच सहाव्या भावाचा स्वामी आहे. सहावा भाव विभिन्न प्रकारच्या समस्या, संघर्ष, चिंता, कॉम्पिटिशन, निवडणूक, उधार, कर्ज, बँक, लोन, आजार तसेच विरोधींचा भाव आहे. नोकरीसाठी सहावा भाव बराच महत्वाचा असतो.

तसेच एकादश भाव आपल्या प्राप्तीचा भाव आहे. यातून आपली कमाई आणि महत्वाकांक्षेला पाहिले जाते. एकादश भावात मंगळाचे संक्रमण बरेच चांगले फळ देणारे मानले गेले आहे आणि येथे मंगळ आपल्या राशीचा असण्यास अधिक उत्तम असेल.

मंगळ ग्रहाच्या या संक्रमनाच्या परिणाम स्वरूप तुमच्या कमाई मध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळेल. एक नाही तर बऱ्याच माध्यमांनी तुमच्या जवळ धन येईल, ज्यामुळे आपली स्थिती लवकरच वर वाढेल आणि आपण आर्थिक रूपाने मजबूत व्हाल. केवळ एवढेच नाही तर आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण झाल्याने आपण खूप प्रसन्न व्हाल.

या काळात आपल्याला सामाजिक क्षेत्रातून देखील लाभ मिळेल. आपली नवीन- नवीन लोकांशी मैत्री होईल आणि काही लोक आपल्याला खूप कमी देखील येतील. आपण आपल्या कुटुंबाकडे देखील लक्ष द्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण आपले धन वापराल. या संक्रमणाचा नकारात्मक बाजू ही राहील की आपल्या प्रेम जीवनात काही समस्या येतील आणि तुमच्या दोघात वाद होण्याची देखील शक्यता आहे , ज्यमुळे आपले नाते कमकुवत होऊ शकते. म्हणून आपले प्रेम जीवन जर व्यवस्थित ठेवायचे असेल तर कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर रहा. आपल्या संतानला देखील या काळात सावध राहिले पाहिजे कारण त्यांना आरोग्याविषयी समस्या होऊ शकते. अभ्यासाविषयी हे संक्रमण चांगले परिणाम देईल आणि आपली एकाग्रता वाढवण्यास मदत करेल.

उपायः आपल्याला मंगळ ग्रहाची शुभता प्राप्त करण्यासाठी मंगळवारी कोणत्यापण हॉस्पिटल किंवा ब्लड बँकमध्ये जावून रक्तदान केले पाहिजे.

कर्क राशि

मंगळ ग्रह आपल्या राशीसाठी अत्यंत महत्वपूर्ण ग्रह आहे कारण हा आपल्या केंद्र आणि त्रिकोणाच्या घराचा स्वामी आहे, ज्यामुळे तो योग कारक बनतो, म्हणजेच तो आपल्याला राजयोग देण्यास सक्षम आहेत. तो आपल्या पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे आणि या संक्रमण काळात आपल्या दहाव्या घरात त्याची स्थापना होईल. पाचवे घर आपली बुद्धिमत्ता, आपली विचार करण्याची क्षमता, आपली कलात्मकता, आपली मुले, आपले प्रेमसंबंध आणि शिक्षण याबद्दल माहिती देते, तसेच दहावे घर सर्वात मजबूत केंद्र मानले जाते. हे आपला व्यवसाय निर्धारित करते आणि आपल्या वडिलांचे प्रतिनिधित्व देखील करते. दहाव्या घरात मंगळाला दिग्बल प्राप्त होते, ज्यामुळे मंगळ या भावमध्ये अत्यंत शक्तिशाली झाला आहे.

दहाव्या घरात मंगळाचे संक्रमण खूप चांगले असल्याचे सांगितले जाते आणि आपल्या राशीमध्ये हे संक्रमण असल्याने, हे संक्रमण आपल्यासाठी अत्यंत फलदायी सिद्ध होईल. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळेल आणि तुमचा सन्मानही वाढेल. आपले वर्कलोड वाढेल. आपले अधिकार आणि आपली शक्ती वाढेल आणि आपल्याला प्रोत्साहित केले जाईल. प्रमोशन आणि पदोन्नतीची पूर्ण शक्यता देखील आहे, परंतु काही वेळा व्यक्ती घाईमध्ये असे निर्णय घेतात, ज्यामुळे त्याना त्याचा पश्चाताप होतो. आपणास या परिस्थितीस टाळावे लागेल आणि खूप आत्मविश्वास देखील ठेवावा लागेल.

मंगळाचे हे संक्रमण आपल्या आरोग्यासाठी थोडासा कमी उपयुक्त आहे, म्हणून कामाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीकडेही लक्ष द्या, अन्यथा जास्त कामांमुळे आपण आजारी पडू शकता. मंगळाचे हे संक्रमण आपल्या कौटुंबिक जीवनात नक्कीच थोडा ताण आणू शकतो, विशेषत: आपल्या मुलांना या वेळी काही समस्या उद्भवू शकतात.

प्रेम जीवनाच्या दृष्टिकोनातून हे संक्रमण उपयुक्त नाही, म्हणून या वेळी आपण आपल्या प्रिय व्यक्तीला कमीत कमी भेटण्याचा प्रयत्न करा कारण जर आपण जास्त भेटलात किंवा अधिक बोललात तर व्यर्थ वाद होऊ शकतो. हे संक्रमण शिक्षणासाठी सामान्य असेल. आपण आपल्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे.

उपायः आपण मंगळवारी तीन मुखी रुद्राक्ष लाल धाग्यात घालून धारण केले पाहिजे.

तुमच्या कुंडलीमध्ये आहे काही दोष? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा अ‍ॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली

सिंह राशि

सिंह राशीच्या जातकांसाठी, मंगळ नववा म्हणजेच भाग्य भाव जो एक त्रिकोण भाव देखील आहे आणि केंद्र भाव अर्थात चौथ्या घराचा स्वामी असल्याने तो एक योगकारक ग्रह आहे आणि आपल्या जीवनास उत्कृष्ट उंची देण्यास सक्षम आहे. चौथे घर आपल्या आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या सुविधाचे, आपल्या आईचे, चल व अचल संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि आमच्या घराबद्दल माहिती देखील देते. नवव्या घराला भाग्य आणि धर्म स्थान म्हणतात.

मंगळाचे हे संक्रमण सामान्यतः आपल्यासाठी फलदायी ठरेल. या संक्रमणाच्या परिणामामुळे आपल्याला लांब आणि दूरच्या प्रवासात जाण्याची संधी मिळेल. तुम्ही या यात्रेत तीर्थक्षेत्र किंवा खडक-पर्वत इत्यादी ठिकाणी जाऊ शकता. या संक्रमणाचा परिणाम आपल्या वडिलांचे आरोग्य कमकुवत करू शकतो. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे.

या संक्रमणाच्या परिणामी, आपल्याला परदेशात बसलेल्या आपल्या संपर्कांशी संवाद साधण्याची एक चांगली संधी मिळेल. हे संक्रमण आपल्या भावंडांसाठी सामान्य असेल. त्यांचे आरोग्य काहीसे कमकुवत होऊ शकते परंतु ते व्यवसायात चांगले पैसे कमवतील. हे संक्रमण आपली मेहनत आणि आपल्या प्रयत्नांना बळकट करेल.

आपल्या कुटुंबास मालमत्ता खरेदी करण्यात यश मिळेल. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाची लाट निर्माण होईल आणि परस्पर संबंध दृढ होतील. कुटुंबात तुमचा आदरही वाढेल आणि तुम्हाला पूर्ण आदरही मिळेल. काही लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात देखील स्थानांतर करावे लागेल.

उपायः आपण मंगळवारी हनुमानाच्या मूर्तीसमोर चमेली तेलाचा दिवा लावावा आणि सुंदरकांडचे पठण करावे.

कन्या राशि

आपल्या राशीसाठी मंगळ हा तिसऱ्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. ही दोन्ही भाव चांगले मानले जात नाही. आठवे घर म्हणजे आयुष्यातील अनिश्चितता आणि अचानक येणाऱ्या चांगल्या-वाईट बदलांना दर्शवतो आणि तिसरे घर जास्त शुभ मानले जात नाही. तथापि, यामुळे आपले धैर्य आणि सामर्थ्य, आपले भाऊ-बहिणी, आपले छोटे प्रवास, आपले कम्युनिकेशन स्किल्स, आपले कठोर परिश्रम, आपला छंद इत्यादीविषयी माहिती मिळते. आपल्या राशीच्या मंगळचे हे संक्रमण आपल्या आठव्या घरात असेल. आठव्या घरात मंगळाचे संक्रमण अधिक अनुकूल मानले जात नाही, म्हणून या संक्रमणातून आपणास जास्त चांगले परिणाम मिळणार नाहीत.

मेष राशीत मंगळाचे संक्रमण आपल्याला आरोग्याच्या दृष्टीकोनातून कमकुवत बनवते आणि या काळात आपल्या आरोग्यास त्रास होऊ शकतो. काही लोकांना शस्त्रक्रिया, कोणत्याही प्रकारची दुखापत, अपघात किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू शकते, म्हणून आपण आपल्या अन्नावर आणि आपल्या दिनचर्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे जेणेकरुन कोणत्याही प्रकारचे आरोग्य समस्या टाळता येईल.

मंगळाचे हे संक्रमण आपल्याला गुप्त आणि अनैतिक मार्गाने देखील फायदेशीर ठरू शकतो, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल, परंतु लक्षात ठेवा अनैतिक मार्गाने येणारा पैसा केवळ अनैतिक कार्यातच वापरला जातो आणि कधीकधी आपल्याला याचा त्रास सहन करावा लागतो.

या व्यतिरिक्त, मंगळाचे हे संक्रमण आपल्या सासरच्या लोकांच्या बाजूने केलेली काही चांगली कामे देखील दर्शवितात आणि आपल्या सासरच्या बाजूच्या लोकांना या काळात धन लाभ होईल. हे संक्रमण आपल्या जोडीदाराच्या आरोग्यासाठी चांगले नाही, म्हणूनच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि या काळात आपल्या लहान भावंडांना आपली आवश्यकता पडू शकते.

उपायः तुम्ही मंगळवारी कोणत्याही मंदिरात जाऊन गहू व गूळ दान करा.

तुळ राशि

तुळ राशीसाठी मंगळ हा दुसर्‍या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. दुसरे घर हे आपल्या कुटुंब,आपले भाषण, आपले खान-पान यासह धन भाव मानले जाते आणि त्याला मारक भाव म्हणून देखील ओळखले जाते. याव्यतिरिक्त, सातवे घर विवाह, जीवनसाथी, व्यवसाय भागीदारी, आयात निर्यात इत्यादीं दर्शवते. या भावला मारक भाव देखील म्हटले जाते. आपल्या राशीसाठी मंगळचे संक्रमण सातव्या घरात असेल, हे संक्रमण मिश्रित परिणाम देणारे सिद्ध होईल.

आपण या संक्रमणाचे निकाल पाहिले तर आपल्या जोडीदाराची वागणूक बदलेल. त्यांच्यात आत्मविश्वास आणि अधीरता दोन्ही वाढतील. ते थोडे हट्टी होतील. तथापि आपण परिस्थिती कुशलतेने हाताळली पाहिजे. जीवन साथीदाराचे आरोग्य बळकट होईल आणि यापूर्वी आलेल्या कोणत्याही आरोग्य समस्यांपासून ते मुक्त होतील. आपल्या आनंदाची बाब म्हणजे ते आनंदी राहण्यासाठी प्रत्येक कार्य स्वतःहून आणि त्वरीत करतील.

जर आपण नोकरी करत असाल तर हे संक्रमण आपल्यासाठी चांगले असेल आणि आपल्याला आपल्या क्षेत्रात पदोन्नती मिळू शकेल. आपण आपले परिश्रमपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत आणि आपले कार्य परिश्रमपूर्वक करावे. आपण व्यवसाय करत असाल तर, मंगळाचे हे संक्रमण धन लाभ करणारे आणि व्यवसाय विस्तार करणारे सिद्ध होईल. आपला व्यवसाय वाढेल आणि आपल्याला फायदा होईल, परंतु आपल्या व्यवसायातील जोडीदाराशी असलेले आपले नाते बिघडू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा.

आपण आपल्या आरोग्याची काळजी देखील घेतली पाहिजे कारण हे संक्रमण आपल्या शरीरात पित्त घटक वाढवते, ज्यामुळे शरीराचे पचन बिगडू शकते. आपल्याला रक्तदाब, अपचन, एसिडिटी, ताप, डोकेदुखी यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या कालावधीत आपण आपल्या जोडीदारावर खूप पैसा खर्च कराल आणि त्यांच्या इच्छेची पूर्तता करण्याचा प्रयत्न कराल जेणेकरून आपण आपल्या जीवनसाथीला आनंदी ठेवू शकता. हे संक्रमण आपल्याला आपण कोठे योग्य आहे आणि आपण कोठे चूक आहे याचा विचार करण्यास प्रवृत्त करेल. वास्तविक हा आत्मनिरीक्षण कालावधी आहे.

उपायः मंगळाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही तांब्याच्या लोट्यामध्ये गुळ किंवा गहू भरून मंदिरात दान केले पाहिजे.

वृश्चिक राशि

मंगळाचे कोणतेही संक्रमण आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण ते आपल्या राशीचे स्वामी आहे आणि राशीच्या स्वामीची अस्थायी स्थिती खूप महत्वाची आहे. आपल्या पहिल्या घरासोबत ते आपल्या सहाव्या घराचेही स्वामी आहेत आणि सहावे घर एक कठीण भाव मानला जातो. हा भाव आपल्या जीवनातील संघर्षाची परिभाषित करतो. आपल्या राशीच्या मंगळाचे संक्रमण सहाव्या घरात असेल. सहाव्या घरात मंगळाचे संक्रमण सामान्यतः शुभ मानले जाते.

या संक्रमणाच्या परिणामी आपली आपल्या नोकरीत प्रचंड प्रगती होईल. आपण जेपण काम करायचा प्रयत्न कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. आपल्याला आपल्या परिश्रमाचे परिपूर्ण परिणाम मिळेल आणि आपल्या विरोधकांवर आपण भारी पडाल . आपल्यासमोर येण्याची त्यांची हिम्मतही होणार नाही ज्यामुळे तुमची कीर्ती आणि यश वाढेल. आपल्यावरील खर्चावर आपले नियंत्रण असेल जे आपली आर्थिक स्थिती मजबूत करेल आणि आपण एखाद्या सुदृढ़ व्यक्तीप्रमाणे आपल्या आयुष्यात पुढे जाल.

जर आपण विद्यार्थी असाल आणि स्पर्धेची तयारी करीत असाल तर आपल्यास यावेळी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे आणि आपला परीक्षेचा निकाल खूप चांगला मिळणार आहे. आपण राजकारणी किंवा कायद्याशी संबंधित व्यक्ती असाल तर तुम्हालाही हे संक्रमण फायदेशीर ठरेल.

या संक्रमणाच्या परिणामी, आपल्याला सरकारकडून लाभ मिळू शकतो किंवा कोणत्याही सरकारी क्षेत्रातील फायद्याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. आपल्या परिश्रमांनी आपण आपले नशीब लिहाल आणि आपले भाग्य वाढेल. तथापि या संक्रमणाचा एक दुष्परिणाम असे म्हटले जाऊ शकते की यावेळी आपल्याला आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात, म्हणूनच आपण संपूर्ण कालावधीत आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. या कालावधीत, आपल्या वडिलांना देखील त्याच्या कार्य क्षेत्रात प्रगती मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंद वाढेल.

उपायः मंगळ ग्रहाचा शुभ प्रभाव प्राप्त करण्यासाठी आपण मंगळाच्या ""ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः" या बीज मंत्राचा जप नियमितपणे केला पाहिजे.

धनु राशि

धनु राशीच्या लोकांसाठी, मंगळ आपल्या पाचव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे आणि मंगळाचे संक्रमण आपल्या राशीतील पाचव्या घरात मंगळची राशी मेषमध्ये असेल, जे तुम्हाला मिश्रित परिणाम देईल कारण पाचव्या घरात मंगळाचे संक्रमण अनुकूल परिणाम देणारा मानला जात नाही.

मेष राशीत मंगळाचे संक्रमण झाल्यामुळे आपल्याला आपली कला पुढे नेण्यासाठी कोणतीही अडचण उद्भवणार नाही आणि आपण आपली कलात्मकता देखील कमावण्याचे साधन बनवू शकता. म्हणजेच आपली कोणतीही कलात्मकता आपल्यासाठी संपत्तीचा मार्ग उघडू शकते. या काळात, आपले उत्पन्न निश्चितच वाढेल, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आपण समाजात खूप पुढे जाऊ शकतात, परंतु दुसरीकडे हे संक्रमण आपल्या वैयक्तिक जीवनात काही समस्या आणू शकतो.

या संक्रमणाचा परिणाम म्हणून, आपल्या प्रेम जीवनात काही समस्या येऊ शकतात. आपला प्रिय व्यक्ती स्वार्थी व थोडासा रागावू शकतो. सर्वकाही करण्यासाठी तो खूप प्रयत्न करेल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. म्हणून संयम सादर करताना आपल्या प्रियकराच्या गोष्टी काळजीपूर्वक ऐका. आवश्यक असल्यास त्यांचे समर्थन करा अन्यथा त्यांना समजावून सांगा.

जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या आयुष्यातील जोडीदारास या काळात खूप चांगले परिणाम मिळतील आणि त्यांची कारकीर्द प्रगती करेल. संक्रमण आपल्या मुलासाठी सामान्य फळ देईल. त्यांचे आरोग्य बळकट होईल आणि ते प्रत्येक काम अधिक चांगल्या पद्धतीने करतील परंतु ते थोडे हट्टी होऊ शकतात ज्यामुळे आपल्याला काही समस्या उद्भवू शकतात.

शिक्षणाच्या दृष्टीकोनातून मंगळाचे हे संक्रमण ठीक-ठाक राहील. आपण पुढे जाण्यास सक्षम असाल आणि आपण आपल्या विषयांवर चांगली पकड ठेवण्यास सक्षम असाल, ज्यामुळे परीक्षेचे निकाल देखील चांगले मिळतील. या काळात आपल्या पोटात उष्मा वाढल्यामुळे पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात, म्हणून काळजी घ्या.

उपायः आपण गुरूवारी विशेषतः सफेद रंगाच्या गायीला गुळ खायला द्यावे.

मकर राशि

आपल्या राशीच्या चिन्हासाठी मंगळ हा चौथ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. मंगळ ग्रहाचे संक्रमण मेष राशीमध्ये चौथ्या घरात असेल परंतु चौथ्या घरात मंगळाचे संक्रमण अधिक शुभ होईल असे म्हटले जात नाही आणि अशा स्थितीत तुम्हाला मंगळाच्या संक्रमणचे मिश्रित परिणाम मिळतील.

चौथ्या घरात मंगळाचे संक्रमण आपल्यास मालमत्तेशी संबंधित फायदे देईल, म्हणजेच वर्षानुवर्षे पूर्वीचे घर घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. जर आपली अनुकूल स्थिती चालू असेल तर आपल्याला या वेळी चाल व अचल मालमत्तेचा पूर्ण लाभ मिळेल आणि आपण एखाद्या मालमत्तेचे मालक व्हाल. या संक्रमणकालीन काळात काही लोक खूप चांगल्या गाडी देखील खरेदी करू शकतात.

हे संक्रमण आपल्या आईच्या आरोग्यावर परिणाम करेल. त्यांच्या वागण्यातही तीक्ष्णपणा येईल, ज्यामुळे कौटुंबिक शांतता कमकुवत होईल. या काळात, कुटुंबात समस्या येऊ शकतात, म्हणून आपल्याला कुटुंबाच्या गरजा आणि जबाबदाऱ्यांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

उपायः आपण मंगळवारी कोणत्यापण मंदिरात जावून लाल झेंडा लावला पाहिजे.

कुंभ राशि

आपल्या राशीसाठी मंगळ हा तिसऱ्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. हे दर्शविते की आपण मंगळाच्या सामर्थ्याने आपले कार्य क्षेत्र मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्यासाठी मंगळाचे संक्रमण तिसर्‍या घरात असेल आणि या घरात मंगळाचे संक्रमण अत्यंत शुभ फळ देणारे मानले जाते. मंगळ देखील स्वत:च्या राशीत असेल, म्हणून हे शुभ परिणाम आणखी वाढतील.

या मंगळाच्या संक्रमणामुळे तुमचे धैर्य व शक्ती वाढेल. आपली जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढेल, जेणेकरून आपण काम करण्यास योगदान द्याल आणि यश मिळवाल. मंगळाचे हे संक्रमण आपल्या भावंडांचा आत्मविश्वास देखील वाढवेल आणि खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यात ते तुम्हाला पाठिंबा देईल. आपण आपल्या कौशल्याच्या आणि आपल्या परिश्रमांच्या बळावर यश मिळवाल .

मंगळाच्या या संक्रमणाच्या परिणामी, तुम्ही तुमच्या शत्रूंवरही विजय मिळवाल आणि त्यांना हवे असले तरीही ते तुमचे नुकसान करु शकणार नाहीत. आपण खेळाडू असाल तर, मंगळाचे हे संक्रमण आपल्याला यश देईल आणि आपल्या खेळाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत करेल.

या मंगळ संक्रमणाच्या काळात तुम्ही काही यात्रा देखील कराल आणि या यात्रा तुमच्यासाठी लाभचा मार्ग मोकळा करतील. आपल्या मित्रांची संख्याही वाढेल कारण आपल्याला काही नवीन लोकांना भेटायला मिळेल.

आपल्याला आपल्या नोकरीमध्ये देखील चांगला वेळ मिळेल आणि आपल्या प्रयत्नांच्या आधारावर आपण आपल्या कामात प्रभुत्व मिळवाल आणि आपली प्रशंसा होईल. आपण व्यापार करत असल्यास, या हालचालीमुळे आपल्या व्यवसायात वाढ होईल आणि आपल्या वस्तूंची मागणी वाढेल.

उपायः मंगळाचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही मंगळवारी डाळिंबाच्या झाडाला पाणी टाकावे.

मीन राशि

मीन राशीच्या लोकांसाठी, मंगळ आपल्या दुसर्‍या आणि नवव्या घराचा स्वामी आहे आणि या संक्रमण काळात आपल्या दुसर्‍या घरात प्रवेश करेल. दुसर्‍या घरात मंगळाचे संक्रमण जास्त शुभ परिणाम देण्यारा मानला जात नाही, तथापि, मंगळ आपल्यासाठी नक्कीच काही चांगले परिणाम आणेल कारण तो स्वतःच्या राशीत संक्रमण करत आहे आणि आपल्या धन भावचा स्वामी देखील आहे.

मंगळाच्या या संक्रमणाच्या परिणामी, तुमच्या जीवनात धन संपत्ती येईल आणि तुमची आर्थिक स्थिती बरीच मजबूत होऊ लागेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण मदत मिळेल आणि वेगवेगळ्या परिस्थितीमुळे तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. हे संक्रमण कुटुंबाचा सन्मान वाढवण्यासदेखील सिद्ध ठरेल, परंतु तरीही काही कारणास्तव कुटुंबात तणाव निर्माण होईल आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांशी वाद-विवाद येऊ शकतात.

आपल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून मंगळाचे हे संक्रमण अधिक अनुकूल असल्याचे म्हणता येणार नाही आणि अशा परिस्थितीत आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागेल कारण असंतुलित खाणे किंवा जास्त मिरची-मसाला किंवा गरम खाद्यपदार्थ वापरल्याने आरोग्यास समस्या होऊशकतो. हे संक्रमण आपल्या जोडीदाराच्या आरोग्यावर देखील परिणाम करेल, म्हणून आपल्याला स्वत:ची आणि जोडीदाराचीही काळजी घ्यावी लागेल.

या संक्रमणाचा परिणाम म्हणून आपल्याला शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय परिणाम मिळतील आणि तुमचा परीक्षेचा निकालही चांगला मिळेल. मंगळाचे हे संक्रमण विद्यार्थ्यांसाठी खूप अनुकूल ठरेल. उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यावेळी शिक्षणासह पार्ट टाइम जॉब करून काही पैसे कमवण्यास सुरवात करतील.

या संक्रमणाच्या प्रभावामुळे, आपल्या प्रेम जीवनामध्ये एक चांगली वेळ येईल आणि आपण आपल्या प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यात वाद होतील, पण ते थोड्या काळासाठीच होईल आणि संभाषण लवकरच सुरू होईल.

उपायः आपण मंगळवारी तीन मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. असे केल्याने आपले भाग्य बळकट होईल.


रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

Astrological services for accurate answers and better feature

33% off

Dhruv Astro Software - 1 Year

'Dhruv Astro Software' brings you the most advanced astrology software features, delivered from Cloud.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
AstroSage Year Book
AstroSage Yearbook is a channel to fulfill your dreams and destiny.
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 750/-

Brihat Horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com