मिथुन राशि मध्ये वक्री बुध: 18 जून, 2020
बुध ग्रह जसे बुद्धि, वाणी, तर्क शक्ति, गणित, व्यापार, सांख्यिकी आणि यात्रेचे कारक मानले गेले आहे ते 18 जून, 2020 ला सकाळी 09 वाजून 52 मिनिटावर विक्री होत आहे. बुधाचे हे परिवर्तन 12 जुलै, 2020, 13 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहील. जिथून ते परत त्याच संकेतात मार्गी गतीमध्ये पुढे जाईल. या काळात विक्री बुध ग्रहाच्या संक्रमणाचा प्रभाव निश्चित रूपात व्यक्तीच्या व्यक्तित्व आणि चरित्रावर पडेल.
या संक्रमणाच्या प्रभावाने व्यक्तीच्या व्यवहारात आलेले परिवर्तन सहजरित्या पाहिले जाऊ शकते. विक्री बुधाचे आपल्या जीवनात बरेच नकारात्मक प्रभाव पडतात कारण, जिथे बुध ग्रह सामान्यतः आम्हाला चांगला प्रभाव देतात तसेच वक्री दशा मध्ये ते त्यांचे उलटा प्रभाव देतील. या काळात व्यक्तीची संचार आणि निर्णय घेण्याची क्षमता सरळता प्रभावित होते. ज्याच्या परिणाम स्वरूप, आम्ही बऱ्याच वेळा अश्या स्थितीमध्ये काही असे निर्णय घेतो की, जे आपल्यासाठी योग्य सिद्ध होत नाही आणि याचा परिणाम आपल्याला भविष्यात भोगावा लागू शकतो.
तर, चला, आता विस्ताराने जाणून घेऊया की, विक्री बुध सर्व 12 राशींवर कुठल्या प्रकारचा प्रभाव टाकणार आहे.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष राशि
मेष राशीतील जातकांसाठी वक्री बुध ग्रह त्यांच्या तिसऱ्या भावात संक्रमण करेल. जे की, सरळतः याकडे इशारा करते की, ही वेळ आपल्या भाऊ-बहिणींसोबतच्या नात्यामध्ये सामंजस्य स्थापित करणे आणि त्यांच्या सोबत काही क्वालिटी वेळ घालवण्यासाठी एक चांगली वेळ सिद्ध होऊ शकते. तसे की, तिसरे घर फिरणे आणि लहान यात्रेला ही दर्शवते अश्यात कुठल्या ही यात्रेवर जाण्याच्या आधी सर्व गरजेचे कागदपत्र आणि रिझर्वेशनची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा तुम्हाला नंतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर अधिक गरजेचे नसल्यास 12 जुलैपर्यंत कुठलीही यात्रा करू नका.
याच्या व्यतिरिक्त जसे की तिसरा घर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना ही प्रभावित करतो आणि हे असे दर्शवते की या काळामध्ये तुम्ही आपल्या फिटनेसची काळजी घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागू शकतो. या काळात कुठलीही गोष्ट बोलण्याच्या आधी विचार करून बोलण्याची आवश्यकता आहे कारण या काळात शब्दांचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो आणि यामुळे तुमचा वाद-विवाद होण्याची शक्यता असू शकते सोबतच कुठल्याही प्रकारचे वचन देण्याच्या आधी वास्तविकता पहा अन्यथा तुम्हाला अवांछित तणाव आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
उपाय : या काळात आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये कपूर लावा
वृषभ राशि
वक्री बुधाचे हे संक्रमण वृषभ राशीच्या दुसऱ्या घरात होईल जे वित्त, संचित धन, भाषण आणि परिवाराचे प्रतिनिधित्व करते. या राशीतील जातकांसाठी आपल्या कमाईसाठी नवीन साधन आणि नवीन विचारांना शोधण्याची एक उत्तम वेळ सिद्ध होऊ शकते. या काळात काही मूळ जातकांना कुणाला दिलेले उधार परत मिळू शकते तथापि, या काळात तुम्हाला धन संचय करण्याचा सल्ला दिला जातो. या संक्रमणाच्या वेळी कुठल्या ही प्रकारची गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. नोकरी करत असलेले जे जातक नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्यांना आता थोडे थांबण्याची आवश्यकता आहे.
ही वेळ आता जाऊ द्या नंतरच काही निर्णय घ्या. नात्याच्या दृष्टीने आपल्या साथीच्या गरज आणि इच्छांच्या बाबतीत जाणण्याची चांगली वेळ आहे. असे करणे तुमच्या नात्याला अधिक मजबूत बनवण्यात मदत करेल कारण, हे वृषभ राशीसाठी शिक्षणाच्या पाचव्या घराला नियंत्रित करते म्हणून, या काळात विद्यार्थी विशेषतः उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेले विद्यार्थी, विषयाच्या चयनाला घेऊन थोडे भ्रमित होऊ शकतात. अश्यात सल्ला दिला जातो की, आपल्या क्षमतेवर लक्ष द्या आणि आपले शिक्षक किंवा गुरु कडून सल्ला घेऊनच निर्णय घ्या. शक्य असल्यास 12 जुलै पर्यंत थांबून जा त्यानंतरच काही निर्णय घ्या.
उपाय : नियमित सकाळी देवी सरस्वतीची पूजा करा.
मिथुन राशि
बुध तुमच्या लग्न भावात वक्री करत आहे जे व्यक्तित्व, आत्म, प्रतिमा आणि कारवाईचे प्रतिनिधित्व करते. जसे की, हे तुमच्या प्रथम भावात होत आहे अश्यात तुम्ही वक्री बुधाच्या संक्रमणाच्या वेळी जर आपल्या कामात दुर्लक्ष दाखवले तर या प्रकारच्या विचारांनी घेरलेले राहाल कि, तुमच्यासोबत काहीच चांगले होत नाहीये.गोष्टींना घेऊन तुम्ही भ्रमित, चिडचिडे, गोष्टींना विसरणारे किंवा ऍक्सिडेंटचा शिकार होऊ शकतात.
जसे प्रथम घर कार्रवाईशी संबंधित आहे, म्हणून यावेळी आपल्याला थोडा उशीरा परंतु विचारपूर्वक कार्य करण्याचा सल्ला दिला जाईल. कोणतेही नवीन कार्य किंवा प्रकल्प सुरू करण्याची ही चांगली वेळ नाही, म्हणूनच या दरम्यान, आपले जुने आणि अपूर्ण काम किंवा प्रकल्प नवीन कल्पनांनी आणि विचारांनी पूर्ण करा जे आपला गमावलेला आत्मविश्वास वाढविण्यात देखील मदत करेल. या राशीच्या काही जातकांना आपण पूर्वी दुर्लक्ष केलेल्या नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित काही संधींचा पुनर्विचार करावा लागेल. मिथुन संचार आणि माहितीचा कारक असल्याने, तुम्हाला असे सूचित केले जाते की आपण या संक्रमण काळा दरम्यान एखाद्यास ईमेल, कागद दस्तऐवज किंवा मैसेज पाठवत असाल तर त्यास पूर्णपणे तपासा आणि आणि मगच पाठवा, कारण यावेळी कोणत्याही प्रकारची मोठी चूक होण्याची शक्यता आहे. जसेकी मिथुन कुटुंबाचा पहिला कारक आहे,यामुळे तुम्हाला हे सूचित केले जातेकी आपण आत्तापर्यंत आपल्या कुटुंबातील सदस्यांकडे जे व्यक्त करू शकले नाही ते व्यक्त करण्यासाठी ही एक चांगली वेळ आहे. हे आपल्याला एकमेकांना समजण्यास आणि आपले नाते मजबूत करण्यास मदत करेल. उपाय : "संकट नाशन" गणेश स्तोत्राने गणेशाची पूजा करा.
कर्क राशि
वक्री बुधाचा हे संक्रमण कर्क राशीच्या बाराव्या घरात होत आहे, जो परदेशी, प्रवास आणि खर्चाचे प्रतिनिधित्व करतो. हे सूचित करते की परदेशात स्थायिक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी किंवा परदेशातून लाभ मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांसाठी ही वेळ काही सकारात्मक बातमी घेऊन येईल. यादरम्यान, त्यांना कदाचित काही सुवर्ण संधी मिळतील जे यापूर्वी काही कारणास्तव त्याच्या हातातून निघून गेल्या होत्या.
या व्यतिरिक्त आपण या वेळी नकळत गमावलेल्या आपल्या काही वस्तू पुन्हा प्राप्त देखील करू शकता. ज्यामुळे आपल्या जीवनात आनंदाचे वातावरण असेल. तथापि, या संक्रमण दरम्यान कार्यक्षेत्राशी संबंधित लोकांचा खर्च त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल, ज्यामुळे आपल्याला थोडी चिंता आणि काळजी वाटू शकते. म्हणून, शक्य असल्यास आपल्या खर्चाबाबत आधीच योजना तयार करा. काही आरोग्याच्या समस्या, विशेषत: डोळा आणि त्वचा रोग, आपल्याला पुन्हा त्रास देऊ शकतात. म्हणून, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. व्यक्तिशः, यावेळी आपल्या जीवनात एक जुना मुद्दा परत येऊ शकेल. तथापि, ही वेळ आपल्यास समस्येचे मूळ शोधण्यात आणि त्याचे निराकरण करण्यात मदत करेल.
उपाय : बुधवारी गणपतीला दुर्वा गवत अर्पण करा.
सिंह राशि
सिंह राशींच्या जातकांसाठी, वक्री बुधचे हे संक्रमण त्यांच्या अकराव्या घरात असेल, ज्याला लाभ, यश आणि नफ्याचे प्रतिनिधी मानले गेले आहे, जे दर्शवते की या क्षणी आपण आपल्या जुन्या मित्रांच्या ग्रुपद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे आपल्या जुन्या मित्रांशी जोडू शकतात जेणेकरुन आपण आनंदी व्हाल आणि जुन्या आठवणी पुन्हा ताज्या कराल. या व्यतिरिक्त काही जातकांना त्यांच्या आधी केलेल्या कोणत्याही गुंतवणूकीचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे.
तसेच, हा कालावधी आपल्यासाठी यापूर्वी सोडलेल्या उत्पन्नाशी संबंधित काही संधी पुन्हा आणू शकतो, म्हणून या वेळी सावधगिरी बाळगा. विशेषतः जे नोकरी क्षेत्राशी संबंधित आहेत आणि प्रोमोशन किंवा इन्क्रीमेंटच्या शोधात आहेत.जसेकी बुध हा राहूशी संबंधित आहे जो या नव्या ट्रेंडचे प्रतिनिधित्व करतो, हे दर्शविते की या राशीच्या व्यापाराशी संबंधित लोकांना जर या संक्रमणाचा पूर्ण आणि योग्य फायदा घ्यायचा असेल तर बाजारपेठेनुसार त्यांनी नवीन पॅकेजिंगसह आणि ट्रेंडनुसार त्यांनी मैदानात उतरले पाहिजे.
उपाय : कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या खिशात एक मुठभर वेलची दाणे ठेवा.
कन्या राशिफल
कन्या राशीतील जातकांसाठी वक्री बुधाचे हे संक्रमण त्यांच्या दहाव्या घरात होईल यामुळे पेशा, करिअर, पिता आणि स्थितीचे प्रतिनिधित्व मानले गेले आहे. ही गोष्ट याकडे इशारा करते की, या परागमनाच्या वेळी तुमच्या वडिलांच्या आरोग्य संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिक रूपात या वेळी तुम्ही एक अश्या स्थितीसाठी आवेदन करू शकतात जे तुम्हाला आधी मिळाले नव्हते आणि व्यावसायिकांसाठी त्या ग्राहकांच्या संपर्कात येण्यासाठी ही एक उत्तम वेळ सिद्ध होऊ शकते,
याच्या व्यतिरिक्त तुमच्यात काही कन्या राशीतील जातकांना या काळात प्रशंसा आणि पद उन्नती मिळण्याची शक्यता आहे तथापि, यासाठी तुम्हाला परागमनाच्या काळात तुमच्या करिअर सोबत पुढे जाण्यासाठी उपेक्षित क्षेत्रात पुनर्विचार करावा लागू शकतो तथापि, बुधाच्या दशेमुळे तुमच्यातील काही जातकांना यावेळी काही पेशावर जीवनात व्यत्ययाचा सामना करावा लागू शकतो. काही ही महत्वाचे निर्णय घेण्याच्या आधी त्यांच्या बाबतीत चांगल्या प्रकारे विचार करा कारण, नंतर त्याला बदलणे किंवा पुनर्मूल्यांकन करावे लागू शकते.
अश्यात जर शक्य असेल तर, 12 जुलै पर्यंत कुठले ही गरजेच्या कागदपत्रांवर सही करू नका. सोबतच, बॉस किंवा सहकर्मीसोबत बोलण्याच्या वेळी एकदम स्पष्ट राहा आणि जितके शक्य असेल स्वतः जाऊन त्यांच्या सोबत बोला. कुणी अन्य लोकांच्या माध्यमाने आपल्या गोष्टी पोहचवण्यात तुमच्या गोष्टींचा अर्थ बदलला जाऊ शकतो यामुळे तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
उपाय : या काळात भगवान विष्णूची पूजा करा किंवा विष्णू सहस्त्रनाम जप करा.
तुळ राशि
तुळ राशीतील जातकांसाठी वक्री बुधाचे हे संक्रमण त्यांच्या नवव्या घरात होत आहे. ज्याला विश्वास, गुरु, भाग्य आणि नशीबचे घर मानले जाते. याच्या व्यतिरिक्त, हे घर कलेचे ही प्रतिनिधित्व करते. अश्यात हे आपल्या केलेले निखारण्यासाठी एक उत्तम वेळ सिद्ध होईल यामुळे तुम्हाला भविष्यात ही याचा पूर्ण लाभ मिळेल. याच्या व्यतिरिक्त, विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली सिद्ध होऊ शकते. अश्यात जर कुठल्या विषयात त्यांना परत परीक्षा द्यायची असेल तर किंवा कठीण विषयाचा अभ्यास करायचा असेल तर, त्यात तुम्ही प्रयत्न करू शकतात तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
याच्या व्यतिरिक्त, तुमचे जुने शिक्षक, गुरु किंवा बॉस सोबत ही मिळण्यासाठी ही वेळ शुभ संकेत देत आहे कारण, हे लोक तुम्हाला काही असा सल्ला देऊ शकतात ज्यामुळे भविष्यात तुम्हाला बरीच मदत मिळण्याची अपेक्षा आहे. लांब दूरच्या यात्रेचा प्लॅन असेल तर पूर्ण सावधानी ठेवा अन्यथा काही दुर्घटनेचा सामना करावा लागू शकतो.
व्यावसायिक रूपात लांब वेळेत कुठल्या गोष्टीची कल्पना करण्यासाठी ही वेळ चांगली नाही असे करण्याने तुम्ही चिंतेत, बैचेन किंवा घाबरण्याचे शिकार होऊ शकतात ज्यामुळे चुका होण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्या महत्वाकांक्षा आणि धैर्याला लहान लहान हिश्यात वाटून त्यावर काम करणे सुरु करा. याने चुका ही कमी होतील आणि तुमची उत्पादकता आणि आत्मविश्वासात ही वृद्धी होईल.
उपाय : बुधाच्या होरा दरम्यान बुधाचा मंत्र जप करा.
वृश्चिक राशि
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी, वक्री बुधचे हे संक्रमण त्यांच्या आठव्या घरात असेल, जो त्यांच्या परिवर्तन आणि आरोग्याच्या घराचे प्रतिनिधित्व करतो. हे सूचित करते की या संक्रमण दरम्यान आपल्याला त्वचा, एलर्जी आणि हार्मोन प्रणाली सारख्या आरोग्याशी संबंधित काही अनावश्यक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.तरी त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये, हे रोग फक्त आपल्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि अशा कोणत्याही आजारावर मात करण्यासाठी असतात.
आपल्यापैकी काही जणांना वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित अचानक लाभ मिळू शकतात ज्याची आपण बराच काळ वाट पाहत होता. जुनी कर्ज कमी करण्यासाठी आणि मागील थकीत देय देण्याच्या बाबतीतही हा काळ खूपच उपयुक्त ठरेल. या व्यतिरिक्त, यावेळेस आपण कोणतेही गुप्त कार्य किंवा संशयास्पद कार्य करणे टाळावे, अन्यथा भविष्यात आपल्यास अडचणी येऊ शकतात. आठव्या घराचा संबंध आपल्या जोडीदाराच्या जमा संपत्तीशी देखील संबंधित असल्याने, त्यांना या संक्रमण दरम्यान काही अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे त्यांच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो.
उपाय : गायीला हिरवा चारा खायला द्या.
धनु राशि
वक्री बुधचे हेसंक्रमण धनु राशीच्या जातकांसाठी त्यांच्या सातव्या घरात असणार आहे, हे दर्शविते की आपल्या जोडीदाराशी जुन्या मतभेदांचे निराकरण करण्यासाठी ही वेळ चांगली असू शकते. आहे. तथापि, या वेळी आपण लग्नाची तयारी करण्याचा किंवा लग्नाची तारीख निश्चित करण्याचा विचार करत असाल तर, बुधवारी या विषयावर मार्ग काढल्यानंतरच या विषयावर पुढे जा,आपल्याला यासंदर्भात 12 जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आपण व्यापारी असाल, तर भागीदारीच्या सौद्यांचा आणि त्यांच्याशी संबंधित अटींचा ज्यास आपण यापूर्वी कोणत्याही कारणास्तव दुर्लक्ष केले आहे त्यांचा पुनर्विचार करण्यासाठी देखील ही एक चांगली वेळ आहे. जसेकी बुध धनु राशींसाठी व्यवसायाच्या घरावर देखील शासन करतो, ज्यावरून हे सूचित होते की आपणापैकी जे नोकरी शोधत आहेत त्यांनासुद्धा या काळात चांगली बातमी मिळेल. जरी ही नोकरी आपल्या इच्छित कार्यक्षेत्रामध्ये किंवा पदासारखी नसेल, परंतु भविष्यात हि आपल्यासाठी उपयुक्त ठरेल म्हणून आपण ती घेण्यास घाबरू नका.
उपाय : बुधवारी 'विष्णू सहस्रनाम' चा जप करा.
मकर राशि
मकर राशींच्या जातकांना या काळात पैशांच्या व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण वक्री बुधचे हे संक्रमण त्यांच्या सहाव्या घरात होणार आहे. यावेळी व्यवसायातील लोकांना त्यांच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. या राशीच्या व्यावसायिकांना या संक्रमण दरम्यान अत्यधिक सतर्क असणे आवश्यक आहे. यावेळी, आपण कोणालाही माहिती किंवा कागदपत्र पाठवत असल्यास, त्यास योग्यरित्या तपासा, अन्यथा मोठी चूक होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अन्यथा आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी काही गैरसमज झाल्यामुळे आपण आणि आपल्या अधीनस्थांमधील काही वाद-विवाद होण्याची शक्यता आहे, ज्याचे काही विपरीत परिणाम होऊ शकतात.
व्यवसाय आणि सेवेव्यतिरिक्त, सहावे घर आजारपण देखील दर्शविते, म्हणूनच या बुधच्या संक्रमण दरम्यान, आपल्या आरोग्याशी संबंधित कोणतीही जुनी अस्वस्थता पुन्हा सुरु जाऊ शकते, ज्याकडे आपले लक्ष आवश्यक आहे. म्हणून या वेळी आपल्या अन्नाची विशेष काळजी घ्या, तुमच्या व्यायामाचे नियमित पालन करा आणि तुमच्या आरोग्यावर अनुकूल परिणाम न करणार्या प्रत्येक वाईट सवयीचा त्याग करा. तसेच, शक्य असल्यास एकदा आपल्या डॉक्टरांना भेटा. या संक्रमण दरम्यान वाहन चालवताना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा आपणास दुर्घटना किंवा दुखापत होऊ शकते.
तथापि, बुधच्या या संक्रमणात आपल्या वडिलांना त्यांच्या संबंधित प्रयत्नांमध्ये इच्छित प्रगती किंवा यश मिळू शकेल.
उपाय : बुधवारी सोने किंवा चांदीमध्ये तयार केलेला जवळपास 5-6 सेंटचा दर्जेदार पन्ना घाला.
कुंभ राशि
कुंभ राशीतील जातकांसाठी 18 जून ला होणारा वक्री बुधाचे हे संक्रमण थोडे आव्हानात्मक राहणारे आहे कारण, या काळात ते तुमच्यामध्ये आत्मविश्वास, रचनात्मकता आणि आत्म अभिव्यक्तीची कमतरता वाटू शकते. या काळात तुम्हाला नवीन विचारांची कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. यामुळे आतापर्यंत योग्य रूपात चालणारी परियोजनांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. कुंभ राशीसाठी पाचव्या घरात होणारा वक्री बुधचे हे संक्रमण आराम करण्याची योग्य वेळ आहे. या काळात आपल्या व्यस्त जीवनात थोडा ब्रेक घ्या आणि आपले काही जेणे शोक किंवा सवयीमध्ये संलग्न राहा जे तुम्हाला करणे आवडत होते आणि जे तुम्ही बऱ्याच काळापर्यंत करू शकले नव्हते. हे तुमच्या रचनात्मकतेला बढावा देईल.
व्यक्तिगत जीवनाची गोष्ट केली असता या राशीतील सिंगल जातकांसाठी कुठल्या ही नवीन नात्यात येण्यासाठी ही वेळ चांगली नाही तथापि, तुमचे जुने प्रेम या काळात तुमच्या आयुष्यात येऊ शकते. याच्या व्यतिरिक्त विवाहित लोकांच्या आयुष्यात संतान पक्षाकडून काही समस्या येऊ शकतात ज्याची तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ही वेळ मुलांसाठी उत्तम वेळ घालवण्यासाठी तसेच त्यांच्याशी गप्पा करण्यासाठी उत्तम सिद्ध होईल.
याच्या व्यतिरिक्त तुमच्यापैकी जे लोक कुटुंबाला पुढे नेण्याचा विचार करत आहे त्यांना 12 जुलै पर्यंत थांबण्याचा सल्ला दिला जातो. जसे की, पाचवे घर मंत्राच्या जप करण्याच्या संबंधित आहे अश्यात तुम्ही या दिशेत ही उत्तम पाऊल टाकू शकतात.
उपाय : गरजू लोकांना जे स्वतःसाठी पुस्तके विकत घेऊ शकत नाही त्यांना पुस्तक दान करा.
मीन राशिफल
मीन राशीसाठी, वक्री बुधचे हे संक्रमण त्यांच्या चौथ्या घरात होईल, जो घर, आई, जमीन, मालमत्ता, अंतरात्मा आणि आनंद दर्शवितो. म्हणूनच जमीन आणि मालमत्तेच्या निर्णयाशी संबंधित कोणतेही निर्णय घेणे टाळा, जसे की जमीन विकत घेणे किंवा विकणे किंवा मालमत्ता हस्तांतरित करणे. शक्य तितके, असे निर्णय 12 जुलै नंतरच घ्या, अन्यथा नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. या वेळी आपण घरामध्ये आपला बहुतेक वेळ यापूर्वी दुर्लक्ष केलेल्या गोष्टी करण्यात घालवाल जसे की लीकेज दुरुस्त करणे किंवा घरातील फर्निचर दुरुस्त करणे. चौथे घर बालपण आणि पालकांचे प्रतिनिधित्व करते, विशेषत: आई, म्हणून आपल्या आईबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा आणि आपल्या बालपणातील दिवस आठवण करा. असे केल्याने तुमच्यात काही फरक असल्यास तो दूर होईल तसेच तुमचे नातेही दृढ होईल.
आपण विवाहित असल्यास, या कालावधीत आपल्या जोडीदारास विलंबित, पगाराची वाढ किंवा पदोन्नती होऊ शकेल. या व्यतिरिक्त, आंतरिक स्वतःशी एक संबंध स्थापित करण्यासाठी आणि नकारात्मक विचारांच्या पद्धती ओळखण्यासाठी आणि त्यास आपल्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी देखील हा काळ खूप चांगला असल्याचे सिद्ध होऊ शकते. हे आपल्याला आपल्या आयुष्यात नवीन दृष्टीकोन आणि अर्थ देण्यात मदत करेल जे आपल्या जीवनात समाधान आणि आनंद देईल.
उपाय : दररोज सकाळी "ओम नमो भगवते वासुदेव" या मंत्राचा जप करा.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2023
- राशिफल 2023
- Calendar 2023
- Holidays 2023
- Chinese Horoscope 2023
- Education Horoscope 2023
- Purnima 2023
- Amavasya 2023
- Shubh Muhurat 2023
- Marriage Muhurat 2023
- Chinese Calendar 2023
- Bank Holidays 2023
- राशि भविष्य 2023 - Rashi Bhavishya 2023 Marathi
- ராசி பலன் 2023 - Rasi Palan 2023 Tamil
- వార్షిక రాశి ఫలాలు 2023 - Rasi Phalalu 2023 Telugu
- રાશિફળ 2023 - Rashifad 2023
- ജാതകം 2023 - Jathakam 2023 Malayalam
- ৰাশিফল 2023 - Rashifal 2023 Assamese
- ରାଶିଫଳ 2023 - Rashiphala 2023 Odia
- রাশিফল 2023 - Rashifol 2023 Bengali
- ವಾರ್ಷಿಕ ರಾಶಿ ಭವಿಷ್ಯ 2023 - Rashi Bhavishya 2023 Kannada