बुधचे मेष राशीमध्ये संक्रमण, जाणून घ्या तुमच्यावरील प्रभाव (25 एप्रिल, 2020)
बुध ग्रह शनिवार 25 एप्रिल 2020 ला प्रातः 2:26 वाजता (24 एप्रिल 2020 रात्री) मीन राशीपासून निघून मंगळाच्या मेष राशींमध्ये प्रवेश करेल. ही राशी काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये प्रथम भाव अर्थात लग्न भावची राशी मानली जाते. ही अग्नी तत्वाची राशी ही आहे म्हणून, या राशीमध्ये बुधाचे संक्रमण शिग्रतेने आपले परिणाम देईल.
बुध ग्रहाच्या मेष राशीमध्ये संक्रमणाचे राशि भविष्य
आता जेव्हा बुध मेष राशीमध्ये संक्रमण करणार आहे तर, चला जाणून घेऊया की, या संक्रमणाचा तुमच्या राशीवर काय प्रभाव पडणार आहे:
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष राशि
तुमचा तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी बुध तुमच्या प्रथम भाव अर्थात तुमच्या राशीमध्ये
संक्रमण करेल. तिसऱ्या भावाचा स्वामी लग्न मध्ये जाण्याने तुम्हाला आपल्या बाहुबळावर
बराच भरोसा होईल आणि तुम्ही बरेच प्रयत्न कराल. स्वतःला यशस्वी बनवण्यासाठी तुमची निर्णय
घेण्याची क्षमता मजबूत होईल आणि तुम्ही या काळात जे निर्णय ते भविष्यात तुमच्यासाठी
बरेच महत्वाचे सिद्ध होतील. तथापि, तुम्हाला अति आत्मविश्वास ठेवण्यापासून वाचले पाहिजे
आणि कुणासोबत ही काही चुकीचे बोलण्यापासून वाचले पाहिजे. या संक्रमण काळात तुम्हाला
भाऊ-बहिणींचे सहयोग मिळेल आणि ते तुमची शक्य तितकी मदत करतील आणि यांचा स्नेह ही कायम
राहील. दुसरीकडे, या संक्रमण काळात सहाव्या भावाचा स्वामी तुमच्या प्रथम भावात जाईल
तुमचे आरोग्य पीडित होऊ शकते. तुम्हाला आरोग्य समस्या जसे त्वचा संबंधित रोग, एलर्जी,
नस संबंधित समस्या त्रास देऊ शकते. दांपत्य जीवनासाठी हे संक्रमण अनुकूल राहणारे आहे.
तुमच्या नात्या मध्ये प्रेमात वाढ होईल आणि दोघे एकमेकांसोबत मोकळ्या मनाने बोलतील
यामुळे मनात असलेल्या अढी मोकळ्या होतील आणि नाते घनिष्ट होईल. हे संक्रमण तुमच्या
दांपत्य जीवनात चांगले स्थापित करेल. व्यापाराच्या बाबतीत थोडे सावध राहण्याची आवश्यकता
आहे अथवा हे चुकीच्या दिशेत जाऊ शकते.
उपायः तुम्ही बुधवारी उपवास ठेवला पाहिजे.
वृषभ राशि
तुमच्या राशीच्या दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी बुध बाराव्या भावात प्रवेश करेल.
हे संक्रमण तुमच्यासाठी मिळते-जुळते परिणाम घेऊन येईल. या संक्रमणाच्या प्रभावाने एकीकडे
तुमच्या खर्चात वाढ होईल आणि तुमचे संचित धन ही काही विशेष कार्यात खर्च होईल. जर तुम्ही
विवाहित आहेत आणि तुमची संतान या दिशेमध्ये प्रयत्नरत आहे तर, त्यांना ही यश मिळेल
आणि ते परदेशात जाऊन कुठल्या चांगल्या कॉलेज मध्ये शिक्षण घेऊ शकतील. तुम्ही आपल्या
बुद्धीच्या बळावर बऱ्याच कामांना समजदारीने कराल. तुम्ही आपल्या व्यवसायात चांगली गुंतवणूक
करू शकतात जे येणाऱ्या काळात तुम्हाला कामी येईल. तुमच्या प्रेम जीवनासाठी ही वेळ अनुकूल
नाही म्हणून तुम्हाला थोडे काळजीपूर्वक राहावे लागेल. कुठल्या कामाच्या कारणाने तुमचा
प्रिय तुमच्यापासून वेगळा होऊ शकतो. तथापि तुमचा संवाद कायम राहिला आणि त्यांच्याशी
अधिक चर्चा करून आपल्या नात्याला टिकवण्याचा प्रयत्न कराल. या संक्रमण काळात खर्चांवर
नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी अति आवश्यक असेल अथवा आर्थिक स्तिथीवर परिणाम होऊ शकतो.
वाद विवादात व्यर्थ पडू नका. आरोग्य या काळात थोडे कमजोर राहू शकते.
उपायः तुम्हाला बुध ग्रहाची अनुकूलता मिळवण्यासाठी चार मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे.
मिथुन राशि
तुमच्यासाठी बुधाचे संक्रमण खूप महत्वाचे आहे कारण, बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे
आणि आपल्या या संक्रमण काळात ते तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करेल. अकरावा भाव आपल्या
कमाईचा आणि आय भाव आहे. या संक्रमणाने लाभ ही मिळतात म्हणून, या भावात बुधाचे संक्रमण
तुमच्यासाठी बरेच अनुकूल राहणारे आहे. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमची वाणी खूप मजबूत
बनेल आणि आपल्या बुद्धी आणि मेधाच्या बळावर चांगले धन लाभ अर्जित करू शकाल. तुमच्या
वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही संबंध उत्तम बनतील त्यांच्यासोबत संवाद सुधारेल आणि त्याचा
लाभ तुम्हाला आपल्या कार्य क्षेत्रात प्राप्त होईल. आपल्या प्रेम जीवनासाठी हे संक्रमण
खूप अनुकूल सिद्ध होईल. तुम्ही आपल्या गोष्टींनी प्रियकराला इम्प्रेस करू शकाल आणि
आपल्या प्रेम जीवनाला नवीन ऊर्जा मिळेल. या संक्रमण काळात तुम्हाला अनेक निलंबित कामांना
पूर्ण करण्यात यश मिळू शकेल यामुळे तुमचे मनोबल वाढेल आणि तुमचा सामाजिक स्तर विस्तृत
होईल. या काळात तुमची काही नवीन लोकांसोबत मित्रता होईल आणि तुमच्या मित्र मंडळींमध्ये
वाढ होईल. हे संक्रमण तुमच्या जीवनाला आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनवेल.
उपायः तुम्ही बुध ग्रह यंत्र किंवा रत्न धारण केले पाहिजे.
कर्क राशि
तुमच्या राशीच्या बाराव्या आणि तिसऱ्या भावाचा स्वामी बुध तुमच्या दहाव्या भावात संक्रमण
करेल. दहावा भाव कर्म स्थान अर्थात प्रोफेशनल स्थान ही असतो. बुधच्या या संक्रमणाने
तुमच्या प्रोफेशन मध्ये उतार आणि चढ दोन्ही स्थिती येतील जिथे एकीकडे तुम्ही आपल्या
प्रयत्नांनी आपल्या कामाला उत्तम बनवण्यात यशस्वी व्हाल आणि तुम्हाला प्रशंसा मिळेल
आणि तुमचे सर्व सहकर्मी तुम्हाला सहयोग करतील यामुळे तुमची मित्रता मजबूत होईल आणि
कामात ही मजा येईल. तसेच दुसरीकडे अचानक स्थानांतरणचे ही योग तयार होऊ शकतात परंतु,
या काळात ते टाळणे गरजेचे आहे. या काळात तुमच्या कामात तुम्हाला बारीक लक्ष देण्याची
आवश्यकता आहे म्हणून, खूप विचार करून काम करा. एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यावर कामाचा
बोझा अधिक असेल आणि तुम्हाला बरेच उदास वाटेल. अश्यात हिम्मत ठेऊन काम करा. या संक्रमणाच्या
प्रभावाने तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या वडिलांचे आरोग्य मजबूत होईल
आणि तुम्हाला आपल्या कुटुंबातील लोकांचे सानिध्य मिळेल. लहान भाऊ बहीण तुमच्या कामात
खूप मदत करतील तसेच, तुमच्या वडिलांसोबत तुमचे संबंध उत्तम बनतील. या संक्रमण काळात
तुमच्या व्यापारात उत्तरोत्तर वृद्धी होईल आणि तुम्ही एक यशस्वी व्यावसायिक बनाल.
उपायः तुम्हाला बुधवारी संध्याकाळी घरात दिवा लावून देवाजवळ काळे तीळ ठेवले पाहिजे.
सिंह राशि
बुधचे संक्रमण तुमच्या राशीच्या नवव्या भावात होईल. नववा भाव तुमच्या भाग्याचा स्थान
असतो आणि सुदूर यात्रेच्या बाबतीत ही ते माहिती देतात. तुमच्या दुसऱ्या आणि अकराव्या
भावाचा स्वामी बुधचे नवव्या भावात प्रवेश करण्याने तुम्हाला धन बाबतीत मजबूत बनवेल
आणि तुमची आर्थिक स्थिती समृद्ध बनेल. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमचे थांबलेले कामे
गती पकडेल आणि तुमच्या कामामध्ये यश मिळेल. जे काम करण्यात तुम्हाला आधी भीती वाटत
होती ते काम तुम्ही आता हिम्मत ठेऊन कराल यामुळे तुम्हाला उत्तम यश ही मिळेल. तुम्ही
पैतृक व्यवसायाला पुढे न्याल आणि जे लोक नोकरी करत आहे त्यांना ही चांगले परिणाम मिळतील.
या संक्रमणाच्या प्रभावाने तुमचे भाऊ बहिणींसोबत उत्तम संबंध तयार होतील आणि त्यामुळे
तुम्हाला आपल्या मनातील गोष्ट सांगण्यास संकोच वाटणार नाही. तुमची निर्णय घेण्याची
आणि प्रयत्न करण्याची शक्ती वाढेल तसेच तुमचे संवाद कौशल्य ही मजबूत होईल. या संवाद
कौशल्याने तुम्हाला बराच लाभ होईल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमचे कौतुक
ही होईल.
उपायः बुधवारी झाडे लावा.
कन्या राशि
तुमच्या राशीचा स्वामी बुध आहे म्हणून, तुमच्यासाठी बुधचे कुठले ही संक्रमण खूप महत्वाचे
ठरेल. हे तुमच्या दहाव्या भावात म्हणजेच कर्म भावाचा स्वामी आहे आणि संक्रमण काळात
तुमच्या आठव्या भावात प्रवेश करेल. आठव्या भावाला सामान्यतः चांगला भाव मानले जात नाही
परंतु, बुध ग्रहासाठी आठवा भाव ही अनुकूल भाव मानला गेला आहे. अश्या स्थितीमध्ये या
संक्रमणाचे तुम्हाला मिश्रित परिणाम मिळतील. याच्या कार्य क्षेत्रात चढ उतार स्थिती
राहील आणि तुम्हाला असे वाटेल की, तुमचे प्रयत्न पूर्णतः यशस्वी होत नाहीय आणि तुमच्या
कार्य क्षेत्राने मन भटकू शकते. या संक्रमण काळात राशीच्या स्वामींच्या अष्टम भावात
जाणे तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या निर्माण करू सजकते आणि तुमचे आरोग्य पीडित होऊ
शकते परंतु, बुध तुमच्या कमाईच्या वाढीचा मार्ग सोडवेल आणि अप्रत्यक्षित रूपात तुम्हाला
धन लाभ होऊ शकतो. काही लोकांना या काळात आपल्या बुद्धीचा प्रयोग गुप्त पद्धतींनी केल्याने
धन प्राप्ती होऊ शकते. याच्या विपरीत, ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध स्थिती अनुकूल आहे
त्यांना या संक्रमणाच्या कार्यक्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. या काळात तुम्हाला आपल्या
आईची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
उपायः तुम्ही बुध ग्रहाच्या बीज मंत्राचा ॐ ब्रां ब्रीं ब्रौं सः बुधाय नमः नियमित जप केला पाहिजे.
तुळ राशि
तुमच्या राशीचे स्वामी शुक्राचे परम मित्र बुध ग्रह आहे आणि हे तुमच्या कुंडली मध्ये
नवव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे. मेष राशीमध्ये संक्रमणाच्या कारणाने हे तुमच्या
सातव्या भावात प्रवेश करतील आणि तुमच्यासाठी विभिन्न प्रकारचे परिणाम घेऊन येईल. हे
संक्रमण सामान्यतः अनुकूल सांगितले जाऊ शकते कारण, संक्रमण काळात तुम्हाला व्यापारात
प्रगती मिळेल आणि तुमचा कारभार वाढेल. जर तुम्ही या वेळी काही नवीन काम करण्याची इच्छा
ठेवतात तर या काळात ते फलीभूत होईल आणि तुम्हाला त्या कामात यश मिळेल. भाग्याची तुम्हाला
पूर्ण साथ मिळेल. यामुळे तुम्हाला त्या क्षेत्रात यश मिळेल ज्याची तुम्हाला अपेक्षा
नव्हती. यात्रा तुमच्या पक्षात राहतील आणि तुमच्यासाठी नवीन लाभाचे मार्ग खुलतील. जर
तुमचा विवाह झालेला नसेल तर या काळात नाते ठरू शकते. याच्या व्यतिरिक्त तुमच्या वाणीमध्ये
गोडवा वाढेल. तुमच्या व्यक्तित्वात आकर्षण वाढेल आणि लोक तुमच्याशी प्रभावित होतील.
या काळात तुमची समाजात लोकप्रियता वाढेल आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल.
उपायः बुधवारी विधाता मुळाला पाण्यात भिजवून अंघोळ करण्याने अनुकूल परिणाम मिळतील.
वृश्चिक राशि
तुमच्या राशीपासून सहाव्या भावात बुधाचे हे संक्रमण होईल. तुमच्यासाठी बुध आठव्या आणि
अकराव्या भावाचा स्वामी आहे म्हणून, सहाव्या भावात बुधाचे संक्रमण अधिक अनुकूल नसेल
आणि या संक्रमण काळात तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होऊ शकतात. तुमच्या त्वचेचा रंग
बिघडू शकतो. या प्रति तुम्हाला सतर्क राहिले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त, आपल्या लोकांसोबत
वाद होण्याच्या कारणाने तुम्हाला समस्या उचलाव्या लागू शकतात आणि तुमचे खर्च बरेच वाढू
शकतात. हे खर्च जर तुम्ही आपल्या नियंत्रणात ठेवले नाही तर तुम्हाला चिंता सहन करावी
लागेल. या काळात तुमच्या कमाईमध्ये कमी दिसेल आणि तुम्हाला काही आर्थिक समस्या येतील.
याच कारणामुळे तुम्हाला बँकेकडून लोन किंवा कर्ज घ्यावे लागू शकते आणि यासाठी तुम्ही
बरेच प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला यश ही मिळेल. बुधाच्या या संक्रमण काळात तुमच्या
वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमच्या संबंधात प्रभाव पडेल आणि त्यात कटुता येऊ शकते म्हणून,
विशेष रूपात या गोष्टीची काळजी घ्या अन्यथा कार्य क्षेत्रात समस्या येऊ शकतात.
उपायः बुधवारी गणपतीची आराधना करा.
धनु राशि
धनु राशीतील लोकांसाठी बुध सातव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी असतो म्हणून, हे तुमच्या
प्रोफेशन आणि तुमच्या जीवनसाथी तसेच व्यापार भावांचा स्वामी आहे. बुधाचे हे संक्रमण
तुमच्यासाठी बरेच महत्वाचे राहील. तुमच्या राशीच्या पाचव्या भावात बुधाचे संक्रमण तुमच्या
कमाई मध्ये निरंतर वृद्धी करणारा सिद्ध होईल आणि तुमच्या योजना पुढे वाढतील. फक्त इतकेच
नाही तर व्यापारात ही तुम्हाला चांगले लाभ मिळण्याची अपॆक्षा आहे. मार्केट मध्ये तुमच्या
कामाचे कौतुक होईल. तुमची मार्केटिंग स्ट्रेटजी उत्तम असेल. जर तुम्ही व्यापार करतात
तर, थोडे सावध करण्याची आवश्यकता आहे कारण, या काळात नोकरी जाऊ शकते. तथापि, येणाऱ्या
काळात लगेचच नोकरीचे योग बनतील. तुमच्या जीवनसाथीला ही या संक्रमण काळात उत्तम होईल.
जर तुम्ही विद्यार्थी आहेत तर, तुमचे शिक्षणात खूप मन लगेल आणि नवीन नवीन गोष्टी शिकाल
तसेच तुम्ही विवाहित असाल तर, तुम्हाला संतान कडून उत्तम फळ मिळतील.
उपायः तुम्हाला प्रतिदिन चंद्र देवाची आराधना केली पाहिजे.
मकर राशि
तुमच्या भाग्य भावाचा स्वामी बुध, जो की, तुमच्या सहाव्या भावाचा स्वामी आहे. आपल्या
या संक्रमण काळात तुमचे सुख भाव अर्थात चतुर्थ भावात प्रवेश करेल. बुधाच्या या संक्रमणाच्या
प्रभावाने तुम्हाला अनेक प्रकारच्या सुख सुविधेची प्राप्ती होईल आणि तुम्ही काही नवीन
वाहन खरेदी करू शकतात. हे वाहन तुमच्या कुटुंब आणि तुमच्या प्रगतीचे माध्यम बनेल. या
वेळात तुमच्या कुटुंबात आनंद वाढेल आणि तुमच्या आई-वडिलांचे आरोग्य ही मजबूत होईल.
प्रॉपर्टी संबंधीत कुठला ही वाद विवाद तुम्ही टाळला पाहिजे कारण, यामुळे तुमच्या कुटुंबावर
नकारात्मक रूपात प्रभाव पडेल. या संक्रमणाच्या प्रभावाने कार्य क्षेत्रात ही तुमची
स्थिती उत्तम बनेल आणि तुम्ही आपल्या कामात उत्तम सिद्ध व्हाल. जर काही कोर्ट कचेरीची
केस चालू आहे तर, त्यात उत्तम परिणाम तुमच्या पक्षात येऊ शकतात आणि तुम्हाला सुख मिळेल.
काही विशेष आयडिया साठी तुमचे आपल्या जवळपासच्या लोकांकडून कौतुक होईल.
उपायः बुध देवाच्या विशेष कृपा प्राप्तीसाठी तुम्हाला विधारा मूळ धारण केले पाहिजे.
कुंभ राशि
बुधाचे संक्रमण तुमच्या राशीच्या तिसऱ्या भावात होईल जे की, काल पुरुषाच्या कुंडली
मध्ये बुधाच्या राशीचा भाव ही आहे म्हणून, बुध येथे मजबूत असेल आणि तुम्हाला तुमच्या
संवाद कौशल्याचा फायदा होईल. जे तुमच्या कुंडलीच्या पाचव्या आणि आठव्या भावाचा असून
तिसऱ्या भावात जाईल म्हणून, शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम परिणाम प्राप्त होतील. तुम्हाला
या काळात काही शारीरिक समस्या राहू शकतात.एकीकडे तुमचे भाऊ बहिणींसाठी अधिक अनुकूल
नसेल आणि या वेळात त्यांना काही समस्या ही होऊ शकतात परंतु, तुमच्यासाठी बरेच फायदेशीर
असू शकते कारण, तुमच्या कमाई मध्ये वाढ होऊ शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर, तुमच्या
संतानला या संक्रमणाचा खूप चांगला लाभ मिळेल आणि ते ज्या ही क्षेत्रात आहे त्यांना
उत्तरोत्तर वृद्धी प्राप्त होईल. तुम्हाला सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन साधनांनी काही
चांगली वार्ता मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. या वेळात तुमच्या लेखनाची प्रवृत्ती
जगू शकते आणि तुम्ही आपल्या काही हॉबीला वाव द्याल. या काळात तुम्हाला मित्रांशी गप्पा
करण्यासाठी बराच वेळ मिळेल. यामुळे तुमची मैत्री अधिक घनिष्ठ होईल. हेच नाही तर तुमचे
शेजारी आणि नातेवाईकांसोबत ही संबंध उत्तम बनतील.
उपायः बुधवारी हिरवी मुंग डाळ गाईला खाऊ घाला.
मीन राशि
तुमच्या राशीसाठी बुध तुमच्या चौथ्या सातव्या भावाचा स्वामी आहे तसेच संक्रमण काळात
तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करेल. या संक्रमण काळाच्या प्रभावाने तुमच्या वाणीमध्ये
आकर्षण वाढेल परंतु, तुम्ही तीव्र प्रतिक्रिया देणारे बनाल म्हणजे, कुणी काही ही बोलले
तर तुम्ही त्वरित उत्तर द्याल परंतु, यानंतर तुम्हाला पच्चताप ही होईल म्हणून, काळजीपूर्वक
बोला अथवा समस्यांचा सामना करावा लागेल. व्यापाराच्या बाबतीत हे संक्रमण तुमच्यासाठी
बरेच फायदेशीर सिद्ध होईल आणि तुमची दूरदर्शिता आणि नवीन नवीन कल्पना तुमच्या व्यवसायाला
पुढे नेईल. दांपत्य जीवनात या संक्रमणाचा प्रभाव हा असेल की, तुमचा जीवनसाथी तुमच्या
कुटुंबाच्या प्रति अधिक समर्पित राहून काम करेल यामुळे तुम्हाला आनंद होईल परंतु त्यांचे
आरोग्य काही प्रमाणात कमजोर होऊ शकते. तुमच्या कुटुंबातील कमाईमध्ये वाढ होईल आणि प्रॉपर्टी
संबंधित गोष्टींमध्ये लाभ ही होईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबातील
लोकांना सहयोग मिळेल.
उपायः तुम्ही बुधवारी राधा-कृष्णची पूजा अर्चना केली पाहिजे.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2023
- राशिफल 2023
- Calendar 2023
- Holidays 2023
- Chinese Horoscope 2023
- Education Horoscope 2023
- Purnima 2023
- Amavasya 2023
- Shubh Muhurat 2023
- Marriage Muhurat 2023
- Chinese Calendar 2023
- Bank Holidays 2023
- राशि भविष्य 2023 - Rashi Bhavishya 2023 Marathi
- ராசி பலன் 2023 - Rasi Palan 2023 Tamil
- వార్షిక రాశి ఫలాలు 2023 - Rasi Phalalu 2023 Telugu
- રાશિફળ 2023 - Rashifad 2023
- ജാതകം 2023 - Jathakam 2023 Malayalam
- ৰাশিফল 2023 - Rashifal 2023 Assamese
- ରାଶିଫଳ 2023 - Rashiphala 2023 Odia
- রাশিফল 2023 - Rashifol 2023 Bengali
- ವಾರ್ಷಿಕ ರಾಶಿ ಭವಿಷ್ಯ 2023 - Rashi Bhavishya 2023 Kannada