Personalized
Horoscope
  • Talk To Astrologers
  • Brihat Horoscope
  • Personalized Horoscope 2024
  • Live Astrologers
  • Top Followed Astrologers
Home » 2014 » Rashi Bhavishya 2014 - Marathi Horoscope 2014 Published: November 28, 2013

Rashi Bhavishya 2014 - राशीभविष्य 2014 - Marathi Horoscope 2014

To check out your Rashi Bhavishya 2015, please click here - Rashi Bhavishya 2015

Start the year with our Rashi Bhavishya 2014 and spend 2014 peacefully with all the problems figured out. With our Rashi Bhavishya 2014 you have the advantage of seeing the whole year in advance and plan accordingly. Will the year be a good one or, will it be a tough one, what aspects of life will give you the most trouble and what aspect of life will be your most enjoyable. Know all with the help of our Marathi Horoscope 2014. These predictions are made based on your Moon sign.

Our best Astrologers have come up with this Marathi Horoscope 2014 which has most concise and reliable information. Rashi Bhavishya 2014 covers all the major aspects of your life like, family, career, love, profession, health and finance. Our Marathi horoscope will help you in figuring out which of these phases of your life is posing problems in 2014. Use our Rashi Bhavishya for 2014 and make the necessary preparations for this year. If you see any signs of health issues mentioned in your Rashi Bhavishya 2014, then you can take precautions to maintain a good health. So, with the help of our Rashi Bhavishya 2014 you can be securely prepared to handle any kind of situation without any worries.

Note: These predictions are based on your Moon sign. If you are not sure about your moon sign, please visit the following page - AstroSage Moon Sign Calculator.

राशीभविष्य २०१४ आता एसट्रोसेजवर उपलब्ध आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्याला सर्वोत्तम राशीभविष्य देण्याचा हा प्रयत्न. २०१४ राशीभविष्य वैदिक ज्योतिषाच्या सिद्धांतांवर बसविले आहे. राशीभविष्य २०१४ मध्ये आपल्याला जीवनातील सर्व पैलूंबद्दल माहिती मिळेल. राशीभविष्य सांगणारे कित्येक ज्योतिषी, कंपन्या व वेबसाईट आहेत, पण कोणा एकावर खात्री ठेवणे कठीण असते. एसट्रोसेजचे अंदाज सर्व गोष्टींचा समतोल ठेऊन बांधण्यात येतात. त्यामुळे जगभरातील सर्व ज्योतिष्यांच्या कोलाहलातून तुम्हाला एसट्रोसेज च्या भाकितांचा सर्वात जास्त उपयोग होईल, याची आम्हाला खात्री आहे. एसट्रोसेज तुम्हाला तुमचे भविष्य अचूक दाखवेल व तुम्ही त्यासाठी नीट पूर्वनियोजन करू शकाल. भविष्याला तोंड द्यायला समर्थ व्हाल. राशीभविष्य २०१४ हे आमच्या पटाईत व माहितगार ज्योतिष्यांनी बनविले आहे. अनेक वर्षांचा अनुभव त्यात त्यांनी कामी लावला आहे. या राशीभविष्यामध्ये येणारे वर्ष कसे असेल, हे तुम्हाला कळेल. तसेच तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश पाडला जाईल - तुमचे वैवाहिक जीवन , सांपत्तिक परिस्थिती, नोकरी वा अजून बरेच काही.

या राशीभाविष्यामध्ये प्रथम तुम्हाला तुमच्या येणाऱ्या वर्षाबाबत सार्वत्रिक माहिती दिली जाईल. त्यानंतर तुमच्या खाजगी जीवनाबद्दल अंदाज दिले जातील जेणेकरून तुम्ही घरातील क्लेष दूर करू शकता. कारण तुम्हाला त्याची पूर्वसूचना मिळाली असेल. त्यानंतर राशीभविष्य २०१४ तुमचे लक्ष तुमच्या आयुष्यातील प्रेम विषयाकडे नेईल. प्रेम हे आपल्या आयुष्यातील एक फार मोठा घटक आहे. जीवनात प्रेम नसेल तर सर्वच पोकळ वाटते. राशीभविष्य २०१४ तुम्हाला येणाऱ्या वर्षातील प्रेमासम्बंधीचे उतार चढाव दाखवेल व त्यात समतोल कसा आणावा, ते सांगेल. त्यानंतर येतो एक अजून महत्वाचा घटक - व्यवसाय. व्यवसायाचे आपल्या जीवनातील महत्व आपल्याला माहीतच आहे. राशीभविष्य २०१४ चा तुमच्या व्यावासायामाध्येही उपयोग होईल. त्यानंतर आपण वळू तुमच्या कामाच्या जागेकडे. ही नेहमीच उबदार, सोयीची असायला हवी. राशीभविष्य २०१४ तुम्हाला ती तशी ठेवण्यास मदत करेल. त्यानंतर, तुमची आर्थिक परिस्थिती देखील तेवढीच महत्वाची असते. कधी कुठल्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल, सांगता येत नाही. राशीभविष्य २०१४ तुम्हाला तुमच्या संपत्तीचा नीट वापर कसा करावा, ते दाखवेल.

सूचना: राशीभविष्य २०१४ चे अंदाज शशी चिन्हांवर (मून साइन्स) वर आधारित आहेत. जर आपल्याला आपले शशी चिन्ह माहित नसेल, तर इथे क्लिक करा: एसट्रोसेज शशी चिन्हे कॅलक्यूलेटर

मेष राशीभविष्य २०१४

Mesh Rashi Bhavishya 2014

मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष सुखाचे असेल. राशीभविष्य २०१४ नुसार कौटुंबिक जीवन सुखी असेल. परंतु शनि व राहू सप्तम स्थानात असल्यामुळे आपल्या पती / पत्नी बरोबर काही मतभेद होण्याचे संकेत आहेत. यामुळे, आपल्या पती / पत्नीला आरोग्यविषयक तक्रारी देखील ग्रासू शकतात. राशीभविष्य २०१४ सांगते की यावर्षी तुम्ही स्वास्थ्य विषयक उतार चढाव अनुभवाल. रोगांपासून काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचे प्रेमजीवन या वर्षी खुलून येईल. परंतु हा काळ अंतर जातीय प्रेम संबंधांसाठी उपयुक्त नाही. त्यामुळे, तुमच्या प्रेमाची व्यक्ती जर दुसऱ्या जातीची असेल, तर सावध राहणे गरजेचे आहे. व्यवसाय-धंद्यामध्ये भरभराट होईल. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष समाधानाचे असेल. उच्च शिक्षणासाठी हा काळ उपयुक्त आहे, चांगले निकाल मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल, त्यांच्यासाठी जून २०१४ नंतरचा काळ हितवाह ठरेल. कृष्ण वर्णीय गायीची सेवा करावी, ज्याने मनोकामना पूर्ण व्हायला मदत होईल. आता वळूया वृषभ राशीकडे.

वृषभ राशीभविष्य २०१४

Vrushabh Rashi Bhavishya 2014

वृषभ राशीच्या लोकांसाठी २०१४ मध्ये खूप आश्चर्ये दडलेली आहेत. तुम्ही आपल्या स्वजनांसाठी काही खास नियोजन कराल, ज्यामुळे तुमचे नावलौकिक वाढेल. जर यापूर्वी तुमचे स्वास्थ्य उत्तम राहिले असेल, तर २०१४ हे आरोय्ग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी सुखाचे जाईल. जर तुम्हाला एखादा जुना आजार त्रास देत असेल, तरी या वर्षी त्यात नक्की सुधारणा होईल. प्रेमजीवन उत्तम असेल, काही बारीकसारीक मतभेद वगळता. राशीभविष्य २०१४ सांगते की वाद टाळणे उपयुक्त ठरेल. राशीभविष्य २०१४ च्या अंदाजाप्रमाणे हे वर्ष नोकरी धंद्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असेल. नोकरी शोधणार्यांना नोकरी मिळेल, परंतु व्यापार धंद्यात गुंतलेले असाल, तर भरपूर परिश्रमाशिवाय फळ मिळणार नाही. कठोर परिश्रमाला मात्र नक्की चांगले फळ मिलेल. आर्थिक दृष्ट्या २०१४ अनुकूल असेल. राशीभविष्य २०१४ सांगते की पहिल्या सहा महिन्यात पैसे वाचविण्याची उत्तम संधी आहे. त्याउलट, वर्ष्याच्या उत्तरार्धात कमाई मध्ये भर पडेल. विद्यार्थ्यांना चांगले यश लाभेल. उपाय म्हणून मुलींची सेवा करणे २०१४ मध्ये अनुकूल ठरेल. आता पाहूया मिथुन राशीसाठी २०१४ काय म्हणतंय.

मिथुन राशीभविष्य २०१४

Mithun Rashi Bhavishya 2014

ज्यांची रास मिथुन आहे त्यांना २०१४ हे वर्ष सुखाचे जाईल. २०१४ मध्ये तुमच्या कुटुंबामध्ये एखादा महत्वाचा समारंभ पार पडण्याची शक्यता आहे. एखादा लग्नप्रसंग घडण्याचा किंवा नवीन अपत्य घरी येण्याचा प्रसंग असेल. परंतु, आरोग्यावर नजर ठेवावी. काही मोठे दुखणे नसले, तरी मोसमी आजारांपासून सावध राहावे. प्रेमाविषयी कोणत्याही बाबतीत आडमुठेपणा करू नये. अन्यथा, आपली प्रेमाची व्यक्ति दुसरीच कडे आकर्षित होऊ शकेल. २०१४ चे राशीभविष्य सांगते की या वर्षी तुम्ही अशा एका व्यक्तिला आकर्षित होऊ शकता, जी तुमच्या सामाजिक वर्तुळातील नसेल.

नोकरी व धंद्यासाठी हे वर्ष अनुकूल आहे. बेकारीपासून मुक्तता मिळेल, अथवा नोकरीत वृद्धी होईल. आर्थिक दृष्ट्या चांगला काळ आहे. २०१४ राशीभविष्य सांगते की तुमची उत्पन्नाची साधने वाढतील. परंतु धोकादायक गुंतवणुकीपासून सावधान असवे. विद्यार्थ्यांसाठीही २०१४ चांगले असेल, खास करून उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे. देवळात जाऊन बदाम दान करावेत, त्याने सुख समाधान वधारेल. आता पाहूया कर्क राशीसाठी २०१४ चे राशीभविष्य काय म्हणते.

कर्क राशीभविष्य २०१४

Kark Rashi Bhavishya 2014

ज्यांची रास कर्क आहे, त्यांना २०१४ हे वर्ष संमिश्र फळे देईल. २०१४ राशीभविष्य सांगते की, वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागेल. राहू व शनि चतुर्थ स्थानात असल्यामुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडवू शकतील. २०१४ मध्ये तुमच्यात व तुमच्या कुटुंबियांमध्ये क्लेष निर्माण होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे तुमच्यावर दडपण येऊ शकते. हा काळ आरोग्य, नोकरी, शिक्षण व प्रवास यांसाठी अनुकूल नाही. आपले स्वास्थ्य तुम्हाला सांभाळावे लागेल. २०१४ राशीभविष्य सांगते की, नोकरीतही बदल होऊ शकतील. वरिष्ठाबरोबर वाद टाळा, तसेच अनावश्यक प्रवासही टाळा. वर्षाचा उत्तरार्ध मात्र यापेक्षा बराच चांगला जाईल. तुमचे त्रास मिटू लागतील. २०१४ राशीभविष्य सांगते की, धार्मिक व आध्यात्मिक कार्य तुम्हाला सुख व शांती देतील. वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या शिक्षणाची पातळी वाढेल, व तुमचे उच्च शिक्षणाच्या दिशेचे प्रयत्न ही यश आणतील. पीडा कमी करण्यासाठी गाईला दुध मिश्रित भात घालावा. आता वळूया सिंह राशीकडे.

सिंह राशीभविष्य २०१४

Singh Rashi Bhavishya 2014

सिंह राशीच्या खाली जन्मलेल्यांना २०१४ चा पूर्वार्ध खूप सुखावह असेल. उत्पन्नाची साधने वाढतील. आप्तांचा व नातेवाईकांचा आधार लाभेल. २०१४ राशीभविष्य सांगते की, हा काळ अपत्य व शिक्षण - दोन्हीसाठी अनुकूल आहे. परन्तु, शनि पंचम स्थानात असल्यामुळे अपत्य-संबंधित ताण-तणाव जाणवतील, कालाबरोबर हे मिटतील देखील. आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. २०१४ राशिभाविश्याच्या मते, प्रेम प्रकरण व अपत्य - दोन्हीसाठी हा काळ हितावह असेल. भरपूर श्रेयस्कर संधी तुमच्या वाट्याला येतील. व्यवसायात भरभराट होईल. बढती मिळण्याची संधी देखील येऊ शकते. विद्यार्थी आपल्या इच्छेच्या प्रवेश चाचण्यांमध्ये उत्तम यश मिळवतील. उत्तरार्धात मात्र खर्च वाढतील. तसेच, हा काळ आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाही. काही अनावश्यक प्रवास पत्करावे लागतील. उपाय म्हणून पिंपळाच्या झाडाला नियमित पाणी घालावे. आता, चर्चा करूया कन्या राशी विषयी.

कन्या राशीभविष्य २०१४

Kanya Rashi Bhavishya 2014

२०१४ तुमच्यासाठी श्रेयस्कर वर्ष असेल. २०१४ मध्ये घरातील वातावरण सुखावह असेल. तुम्ही सुखी, समाधानी व निरोगी राहाल. परंतु जीभेवर ताबा ठेवणे शहाणपणाचे ठरेल. तसेच, अनावश्यक खर्च करू नयेत. खास करून, वर्षाचा उत्तरार्ध प्रेमासाठी व लग्नासाठी अनुकूल असेल. २०१४ राशिभाविश्यानुसार तुम्ही तुमच्या व्यवसायात काहीतरी अलौकिक करण्याचे संकेत दिसतात. बढती देखील शक्य आहे. २०१४ मध्ये तुमच्या वाट्याला येणाऱ्या संधी वाढतील. परंतु, शनि व राहू द्वितीय स्थानात आहेत. त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवणे तुम्हाला कठीण जाईल. परंतु जुलै मध्ये राहूचे संक्रमण होईल, व त्यामुळे बचतीचे प्रमाण वाढेल तसेच आरोग्यावर हितकारक परिणाम होईल. २०१४ राशीभाविश्याच्या संकेताप्रमाणे विद्यार्थ्यांनाही चांगले यश लाभेल. कपाळावर शेंदूर लावावा, त्याने अधिक चांगली प्रगती होईल. आता पाहूया तूळ राशीचे भविष्य.

तूळ राशीभविष्य २०१४

Tula Rashi Bhavishya 2014

२०१४ हे वर्ष तुम्हाला संमिश्र निकाल देईल. आध्यात्मिक प्रवृत्तीचे असाल, तर घरात तुम्ही संतुलित वातावरण निर्माण कराल, कारण नवव्या स्थानातील गुरु तुमचे नशीब बलवत्तर करीत अहे. शनि व राहू प्रथम स्थानात असल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतील. परंतु, जुलै मधल्या राहू संक्रमणानंतर स्वास्थ्य विषयक काळज्या मिटतील. हे वर्ष प्रेम विषयक बाबींसाठी अनुकूल आहे. परंतु, वैवाहिक जीवनात काही उतार चढाव येतील. २०१४ राशिभाविष्याचा सल्ला आहे की, फालतू दावे - खटले यांमध्ये अडकू नये, त्याने केवळ पैसा व वेळ खर्ची जाईल. व्यावसायिक पातळीवर देखील अडचणींना तोंड द्यावे लागेल. पण त्या अडचणींवर मात करून तुम्ही यश मिळवाल. सांपत्तिक दृष्ट्या, २०१४ हे साल सरासरीचे असेल. परिश्रम केल्यास विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेश जाऊ इच्छिणार्यांसाठी हा काळ अनुकूल अहे. उपाय म्हणून वानरांची सेवा करावी. तसेच मांसाहारी अन्न व दारू यांचे सेवन टाळावे. आता चर्चा करूया वृश्चिक राशीची.

वृश्चिक राशीभविष्य २०१४

Vrushchik Rashi Bhavishya 2014

२०१४ च्या सुरुवातीला गुरु तुमच्या कुंडलीच्या अष्टम स्थानात असल्यामुळे यश प्राप्तीसाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील. कुटुंबियांचा स्वभाव विचित्र वाटेल, असुरक्षिततेच्या भावनेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकेल. २०१४ राशिभाविश्यानुसार शक्यतो दावे - खटले टाळा. अनावश्यक प्रवासही तुमच्यासाठी हितकारक नाही. प्रेम संबंधातही काही बेबनाव येऊ शकतील. परिश्रमांना देखील हवे तसे फळ मिळणार नाही. परंतु, २०१४ चा उत्तरार्ध परिस्थितीत सुधारणा आणेल , कारण त्या काळात गुरु तुमच्या नवव्या स्थानात असेल. राहू तुमच्या कुंडलीच्या अकराव्या स्थानात जुलै महिन्यात पोहोचेल. या संक्रमणाने तुमच्या आयुष्यात सुधारणा येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल सुधारतील, तसेच उत्पन्नही सुधारेल. तूप व बटाटे यांचे दान हितकारक ठरेल. आता बघूया धनु राशीचे भविष्य.

धनु राशीचे भविष्य २०१४

Dhanu Rashi Bhavishya 2014

२०१४ चा पूर्वार्ध तुमच्यासाठी फारच लाभदायक असेल. २०१४ राशीभविष्याच्या संकेतानुसार कुटुंबात सुसंवाद नांदेल. तुम्हालाही टवटवी आल्यासारखी वाटेल. शनि व राहू अकराव्या स्थानात असल्यामुळे तुमची प्रगती चांगली होईल. पण शनीच्या चढत्या स्थानावरच्या प्रभावामुळे तुमच्यात काही नकारात्मक भावना येऊ शकतात. तुमचा प्रयत्न नकारार्थी कार्य व वाईट सवयी टाळण्याचा असावा. २०१४ राशीभाविश्यानुसार तुम्हाला प्रेम व लग्नामध्ये अपेक्षित निकाल मिळतील. परंतु, शनिच्या पंचम स्थानातील प्रभावामुळे तुमच्यात व तुमच्या प्रेमाच्या व्यक्तिमध्ये वादविवाद होऊ शकतील. क्षुल्लक बाबींवर वाद टाळावा. व्यावसायिक दृष्ट्या समाधानकारक काळ. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे फळ मिळेल. परंतु वर्षाच्या उत्तरार्धात आयुष्याच्या प्रत्येक पैलूत अडचणी येऊ शकतात. गुंतवणुकी सावधानपूर्वक कराव्यात. झटपट पैसा कमावण्याच्या लुचपतीपासून सावध राहावे. नोकरपेशा माणसांनी देखील सावध राहावे. नोकरी बदलावी लागेल किंवा न आवडणाऱ्या जागी बदली होऊन जावे लागेल. दर चार महिन्यांनी वाहत्या पाण्यात नारळ सोडावेत, ज्यामुळे चांगली प्रगती होईल. आता वळूया मकर राशीकडे.

मकर राशीभविष्य २०१४

Makar Rashi Bhavishya 2014

२०१४ तुमच्यासाठी कडूगोड ठरेल. या महिन्याच्या सुरुवातीलाच गुरु तुमच्या पंचम स्थानात संक्रमण करीत आहे. आर्थिक कार्यांमध्ये उतार-चढाव येतील. कर्ज संबंधित बाबींकडे बारीक लक्ष द्यावे लागेल. तुमच्या २०१४ राशीभविष्याप्रमाणे कुटुंबीयांबरोबर काही मतभेद होतील. तसेच, आरोग्यावरही परिणाम होतील. परंतु, रोगांनी तुम्ही त्रासणार नाही. काही वाद व खटले यांचेही संकेत आहेत. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असल्यामुळे तुम्हाला विजय प्राप्त होईल, अडचणींवर मात केल्यानंतर. तुमचे शत्रूही तुम्हाला त्रास देतील, परंतु अखेर विजय तुमचाच होईल. वर्षाच्या उत्तरार्धात लग्न केल्यास सुख प्राप्ती होईल. तुमच्या घरात एखादा मंगल प्रसंग घडण्याचे संकेत आहेत. भागीदारीत काम करीत असाल, तर फायदा निश्चित आहे. उत्पन्न व ज्ञान, दोन्ही या वर्षी वाढतील. पिवळ्या रंगांचे वस्त्र पुजाऱ्यांना दान केल्याने उन्नती होईल. आता बघूया कुंभ राशीचे भविष्य.

कुंभ राशीभविष्य २०१४

Kumbh Rashi Bhavishya 2014

२०१४ ची सुरुवात तेजस्वी असेल. तुमच्या कुटुंबामध्ये काही मंगल प्रसंग पार पडतील. परिवार वृद्धीच्या दृष्टीने अनुकूल काळ. हा काळ शिक्षणाच्या दृष्टीनेदेखील फारच हितावह असेल. दूरचे प्रवास हितकारक ठरतील. आध्यात्मिक प्रवासांसाठी तर हा काळ खूपच अनुरूप आहे. चांगले आरोग्य तुमची साथ देईल, परंतु पथ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. नफे भरभरून वाढतील. शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. परंतु वर्षाच्या उत्तरार्धात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. काहीजण कारणाशिवाय तुमच्या विरुद्ध जातील. कर्जांवरून देखील वाद-विवाद होऊ शकतील. मोठी गुंतवणूक टाळलेली बरी. जलमार्गाने प्रवास करणे टाळा. भात, गुळ व चणे यांचे देवळात दान करून नकारात्मक प्रभाव टळू शकतात. आता वळूया शेवटच्या राशीकडे, मीन राशीकडे.

मीन राशीभविष्य २०१४

Meen Rashi Bhavishya 2014

साल २०१४ तुमच्यासाठी हितकारक ठरेल. जरी शनिच्या धैय्येचा प्रभाव तुमच्यावर पडेल, तरीदेखील गुरूची छत्रछाया तुमच्यावर राहील. घरात सुसंवाद नांदेल. चांगले आरोग्य तुमची साथ देईल. नवीन घर अथवा वाहन विकत घेण्यासाठी हा काळ चांगला आहे. २०१४ राशीभविष्यानुसार वर्षाचा उत्तरार्ध प्रेमसंबंध व लग्न यांसाठी अनुकूल आहे. परंतु जुलैनंतर राहू तुमच्या सप्तम स्थानात संक्रमण करेल व वैवाहिक जीवनामध्ये तणाव निर्माण करू शकेल. आपल्या धंद्यामधले भांडवल तुम्ही या वर्षी वाढवू शकता. वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील. बेत मांडताना काही नवीन उपक्रम देखील हाती घ्याल. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. भागीदारीत असलात तर सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ हितकारक आहे. उच्च शिक्षणाचे बेत आखणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष हितकारक ठरेल.

खिशात चौकोनी चांदीचा तुकडा ठेवावा, ज्यामुळे अधिक फायदे मिळतील.

पंडित हनुमान मिश्र

2014 Articles

Astrological services for accurate answers and better feature

33% off

Dhruv Astro Software - 1 Year

'Dhruv Astro Software' brings you the most advanced astrology software features, delivered from Cloud.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
AstroSage Year Book
AstroSage Yearbook is a channel to fulfill your dreams and destiny.
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 599/-

Brihat Horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

AstroSage TVSubscribe

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com

Reports

Live Astrologers