राशी भविष्य 2015
तुमच्या वर्षाची सुरुवात जोमात करता यावी आणि वर्षभराची योजना आधीच आखता यावी यासाठी तुमच्यासाठी 2015 सालातील भविष्य घेऊन आलो आहोत. आमच्या तज्ज्ञ ज्योतिषांनी 2015 सालातील भविष्याचे अंदाज तयार केले आहेत. राशी भविष्य 2015 मध्ये तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण अंगांना स्पर्श केला आहे. राशी भविष्य 2015 मध्ये सर्व राशींसाठीचे विस्तृत अंदाज वर्तविण्यात आले आहेत. या वार्षिक भविष्यामध्ये तुमच्या चंद्रराशीनुसार भविष्य वर्तविण्यात आले आहे. तुमचे करिअर, वित्त, कुटुंब, प्रेम, आरोग्य आणि शिक्षण या विषयीचे भविष्यातील अंदाज या 2015 सालच्या राशीभविष्यात वर्तविण्यात आले आहेत.
सूचना - हे भविष्य तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. तुमच्या चंद्रराशीबाबत तुम्हाला खात्री नसेल तर खालील संकेतस्थळाला भेट द्या - अॅस्ट्रोसेज मूनसाइन कॅल्क्युलेटर
मेष राशी भविष्य 2015
मेष राशीच्या व्यक्तींवर त्यांच्या स्वामीकडून, गुरूकडून
कृपादृष्टीचा वर्षाव होणार आहे. तुमच्या नवव्या घराचा स्वामी (भाग्येश) तुमच्या चौथ्या
आणि पाचव्या घरात असणार आहे. त्यामुळे 2015 सालातील पहिले सहा महिने कौंटुबिक आयुष्य
सुखाचे राहील. तुम्ही परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल
आहे. नवीन कार किंवा घर घ्यायची आहे? थोडेसे प्रयत्न करा आणि तुमची इच्छा पूर्ण होईल.
दुसऱ्या सहामाहीचा काळ प्रेम आणि लग्नासाठी एकदम योग्य आहे. ज्या दांपत्यांना अपत्य
हवे आहे त्यांना या कालावधीत अपत्यप्राप्ती होईल. उद्योजक त्यांच्या कामाची व्याप्ती
वाढवतील. तुम्ही एखाद्या नवीन योजनेसह नवे काम सुरू कराल. राशी भविष्य 2015 अनुसार
तुम्हाला या काळात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक वृद्धीसाठी हा सुयोग्य काळ आहे.
असे असले तरी आठव्या घरात असलेला शनि आणि सहाव्या घरात असलेला राहू यामुळे तुमच्या
कौटुंबिक आणि आरोग्याच्या आघाडीवर तुम्ही स्वस्थ नसाल. तुम्ही याबाबत वेळोवेळी विचार
करायला हवा. १२ व्या घरात असलेल्या केतू हेच दर्शवतो की, तुम्ही अडचणीत सापडून अतिउत्साहीपणे
वागण्यापेक्षा दुसऱ्यांचा सल्ला घेणे चांगले. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल.
मेष राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करण्याचे उपाय : चांदीची चौरसाकृती वस्तू स्वतःजवळ ठेवा.
वृषभ राशी भविष्य 2015
2015 साला गुरू तुमच्यावर खुश असल्याचे दिसत आहे.
गुरूच्या अनुकूलतेमुळे तुम्ही योग्य दिशेने प्रवास कराल आणि तुम्हाला यशही मिळेल. तुम्ही
तुमचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडालच, त्याचबरोबर तुम्हाला आदर, सन्मान मिळेल आणि तुमची
प्रशंसा होईल. असे असले तरी वृषभ राशी भविष्य 2015 सालच्या कुंडलीनुसार शनि आठव्या
घरात असल्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळण्यात थोडे अडथळे निर्माण होतील. पण काळजी करू नका,
सुखाचे मूल्य तुम्हाला जाणवावे यासाठीच आनंदाच्या क्षणांआधी तुम्हाला थोडे कष्ट सोसावे
लागतील. त्याचबरोबर तुमच्या खासगी आयुष्यात अनुरूपतेचा अभाव निर्माण होईल. पण थोडेसे
प्रयत्न करून तुम्ही सगळे अडथळे पार करत विजयी व्हाल. तुमच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे
झाले तर पाचव्या घरात असलेला राहू हेच दर्शवतो की, प्रेमात सत्यता आणि प्रामाणिकपणा
हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडादाराशी प्रामाणिक राहाल,
याची काळजी घ्या. संपत्तीविषयी सांगायचे झाल्यास, हे वर्ष अत्यंत उत्तम असणार आहे.
फ्रिज, वॉशिंग मशीन यासारख्या उपकरणांवर थोडासा खर्च होईल. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना
2015 सालात काही अनपेक्षित निकाल पाहावयास मिळतील.
वृषभ राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करण्याचे उपाय: काळ्या रंगाच्या गायीची सेवा करा.
मिथुन राशी भविष्य 2015
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालात जादूचा पेटारा
उघडणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी
काही करण्याची इच्छा मनात बाळगली असेल तर तुमच्या प्रयत्नांना निश्चितच यश मिळणार आहे.
याला आपण सकारात्मक अर्थाने ‘सोन्याहून पिवळं’ असं म्हणू शकू. 2015 सालात तुम्हाला
नाव, प्रसिद्धी, संपत्ती आणि एखाद्याची जे जे मिळविण्याची इच्छा असते, ते सर्व तुम्हाला
मिळेल. या पेक्षा अजून तुमची मागणी काय असेल? 2015 सालच्या मिथुन राशीच्या भविष्यानुसार
आरोग्यसुद्धा स्थिर राहील. तुम्ही खूप वर्षांपासून एखाद्या आजाराचा सामना करत असाल
तर त्यात या वर्षी सुधारणा झालेली दिसून येईल. एकूणच या काळात तुम्हाला जॅकपॉट मिळेल.
संपूर्ण वर्षच प्रेमाप्राप्तीसाठी अनुकूल आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल
आणि तुम्हाला बदल हवा असेल तर काही अधिक चांगले मिळविण्यासाठी हा योग्य काळ आहे. त्यामुळे
एखादी नवीन संधी चालून आली तर अजिबात सोडू नका. दुसरीकडे, व्यावसायिकांना थोडे अधिक
कष्ट करावे लागतील, पण लक्षात ठेवा, कष्टांचे फळ हे चांगलेच असते. त्यामुळे 2015 सालच्या
मिथुन राशीची कुंडली हेच सांगते की, कष्ट करण्यात अजिबात कचरू नका. विद्यार्थ्यांबाबत
सांगायचे झाले तर त्यांना चांगले निकाल मिळतील.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालात करावयाचा उपाय: लहान मुलींची सेवा करा.
कर्क राशी भविष्य 2015
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष काही बाबतीत
अत्यंत अनुकूल असणार आहे. तुमचे वय विवाहायोग्य झाले असले तर या वर्षी तुमचा लग्नयोग
आहे. त्यामुळे तयार राहा! तुम्ही स्वतः लग्न कराल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या
व्यक्तीचे लग्न होईल, त्यामुळे तुमचे घर हे लग्नघर असेल, हे निश्चित आहे. कर्क राशी
भविष्य 2015 अनुसार प्रेमप्रकरणांमध्ये पिच्छा पुरववून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे
संयमी आणि काळजीपूर्वक वागा. कामच्या बाबतीही 2015 साल हे उत्तम असेल. कामात बढती मिळण्याची
शक्यता आहे. हा कालावधी तुमच्यासाठी अत्योत्तम असणार आहे, असे दिसते. कामाच्या निमित्ताने
तुम्हाला प्रवास करावा लागेल. पण हा प्रवास बहुधा निष्फळ ठरेल. पण एकूणच 2015 हे वर्ष
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आरामदायी असेल. तुमची आर्थिक बाजू या वर्षाय बळकट असली
तरी आंधळेपणाने गुंतवणूक करणे योग्य राहणार नाही. शेवटी तुमच्यासाठी एक काळजीच कारण
आहे. तुमच्या प्रकृतीमध्ये उतार-चढाव दिसून येतील. याचा अर्थ तुम्ही आजारी पडालच असे
नाही. फक्त तुम्हाला थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हे वर्ष
शुभ असेल. वर्षातील ९० टक्के कालावधी कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल.
कर्क राशींच्या व्यक्तींनी 2015 सालात करावयाचे उपाय: देवळात बदाम दान करा.
सिंह राशी भविष्य 2015
सिंह राशीच्या 2015 सालच्या कुंडलीनुसार हे वर्ष संमिश्र
असेल. गोंधळून जाऊ नका. काही काळ खूप चांगला असेल तर काही काळ थोडासा उतार-चढावांचा
असेल. 2015 सालातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये गुरू तुमच्या १२ व्या स्थानात आहे आणि
शनि चौथ्या स्थानात आहे. त्यामुळे तुम्हाला थोड्या अडथळ्यांचा सामना करावा लागेल. पण
वैतागून जाऊ नका, हा तुमच्या क्षमता तपासण्याचा काळ आहे. तुमच्या आप्तेष्टांच्या वागणुकीचा
तुम्हाला त्रास होऊ शकेल, पण तुलनेने वर्षाचा उत्तरार्ध अधिक चांगला दिसून येत आहे.
तुमचे त्रास या कालावधीत हळुहळू कमी होतील. असे असले तरी या काळात तुम्हाला कुणी काही
बोलले तरी फार मनावर घेऊ नका. 2015 सालातील सिंह राशीच्या कुंडलीनुसार या काळात स्थिर
आणि शांत राहिलेले योग्य राहील. तुमच्या अचूनक योजनेमुळे तुम्ही कठीण परिस्थितीवर मात
कराल. तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात. एकूणच या वर्षी अनेक औत्सुक्यपूर्ण घटना घडतील.
2015 या वर्षाच पुरेपूर वापर करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या क्षमतांचा
शोध लागेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित एक असामान्य व्यक्ती होऊ शकाल.
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालात करावयाचा उपाय: गायीला दूधभात खाऊ घाला.
कन्या राशी भविष्य 2015
कन्या राशीच्या कुंडलीमध्ये 2015 सालाच्या पहिल्या
सहा महिन्यांमध्ये राहू ११ व्या स्थानात असेल. त्यामुळे तुम्हाला बराच फायदा होईल.
हा तुमच्यासाठी अनपेक्षित घटनांचा काळ असणार आहे. या काळात कुटुंबातील सदस्यांचीसुद्धा
भरभराट होणार आहे. पण राहू पहिल्या घरात असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे
आवश्यक राहिल. पण यात काळजी करण्यासाठे फार कारण नाही. केवळ सतर्क राहा आणि प्रत्येकाच्या
आरोग्याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे या वर्षातील पहिले सहा महिने प्रेमसंबंध, विवाह
आणि मुलांसाठी चांगले असतील. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या दृष्टीनेसुद्धा हा काळ
अनुकूल आहे. कन्या राशी भविष्य 2015 अनुसार या वर्षात तुम्हाला खूप संधी मिळणार आहेत
आणि जल्लोष करण्यासारखे खूप क्षण येतील. पण या वर्षाच्या उत्तरार्धात मात्र काळजी घेण्याची
गरज आहे. तुम्हाला फक्त सतर्क राहण्याची गरज आहे, फार गंभीर घटना घडण्याची शक्यता नाही.
खर्चात काही प्रमाणात वाढ होईल आणि प्रकृतीच्या कुरबुरी सुरू राहतील. काळजी करू नका,
तुमच्याबद्दल फार वाईट काहीही होणार नाही. त्यामुळे संयमाने आणि विचाराने वागणे योग्य
राहील.
कन्या राशीच्या व्यक्तींनी 2015 सालामध्ये करावयाचे उपचार: पिंपळाच्या झाडाला नियमित पाणी घाला.
तुळ राशी भविष्य 2015
तुळ राशींच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष लाभकारक आहे.
तुळा राशींच्या व्यक्तींच्या कौटुंबिक आयुष्याबाबत सांगायचे झाले तर थोडे फार गैरसमज
होण्याची शक्यता आहे. असे असले तरी एकोप्याला फार धक्का लागणार नाही. आरोग्याचा विचार
करता 2015 साल उत्तम आहे. तुम्ही घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर आता त्या
द्विधा मनस्थितीतून बाहेर पडा. ठोस निर्णय घ्या. 2015 चा उत्तरार्ध हा तुमच्यासाठी
गुलाबी काळ असणार आहे. खासगी बाबतीत तुम्हाला अनेक आनंदाचे क्षण लाभणार आहेत. त्यामुळे
या गुलाबी वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी तयार राहा. तुळा राशीच्या कुंडलीनुसार या वर्षभरात
तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी विशेष करून दाखवणार आहात. तुम्हाला नवी उर्जा
मिळाली आहे, असे वाटत आहे. नोकरीमध्ये बढती होण्याची खूप शक्यता आहे. लोकांकडून सहकार्य
मिळे आणि तुमच्याविषयी असलेल्या आदर आणि सन्मानात वाढ होईल. शनि दुसऱ्या घरात आल्यामुळे
खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला खर्च करताना हात थोडासा आखडता घेण्याची गरज
आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सकारात्मक राहील.
तुळ राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करावयाचा उपाय: कपाळावर केशरी टिळा लावा.
वृश्चिक राशी भविष्य 2015
2015 साली बहुतेक ग्रह तुम्हाला अनुकूल असतील.
तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल. त्यामुळे 2015 हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले असेल.
वृश्चिक राशीच्या कुंडलीनुसार फक्त शनिच्या स्थानामुळे थोडेसे उतार-चढाव असतील, बाकी
सर्व एकदम उत्तम राहील. कारण सगळंच सुरळीत राहिलं तर जगण्यात मजा नाही, थोडे खाचखळगे,
अडथळे असतील तर जगण्यातील लज्जत वाढते. कौटुंबिक सौख्य राहील. प्रेमाच्या संदर्भात
2015 हे वर्ष उत्तम राहील. शनि प्रथम स्थानात आल्यामुळे वैवाहिक आयुष्यात काही अडचणी
निर्माण होतील. काही वेळाप्रेमासाठी झुरणेही चांगले असते. त्याचप्रमाणे तुम्हाला काही
आरोग्याच्या तक्रारी सतावतील. काळजी करू नका, काहीही गंभीर घडणार नाही. हा काळ कामासाठी
चांगला आहे. त्यामुळे कामाचा ध्यास घेणाऱ्यांसाठी हा काळ खूपच चांगला असेल. 2015 सालच्या
वृश्चिक राशीच्या कुंडलीनुसार आर्थिक स्थिती चांगली राहील. त्यामुळे काय काय खरेदी
करायचे आहे, याची एक यादी करून ठेवा. दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज
होईल. या वर्षाच्या उत्तरार्धात व्यवसायाशी निगडीत शिक्षण घेणाऱ्यांची प्रगती होईल.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालात करावयाचे उपाय: माकडांची सेवा करा आणि मांसाहार व मद्यप्राशन टाळा.
धनु राशी भविष्य 2015
2015 सालाच्या सुरुवातील गुरू धनु राशीच्या आठव्या
घरात आहे, ही फार सकारात्मक बाब नाही. असे असले तरी फारशी नकारात्मकही नाही. त्याचबरोबर
शनि १२ व्या घरात आहे, त्यामुळे आर्थिक बाबी विचारपूर्वक हाताळाव्या लागतील. या सगळ्याचे
व्यवस्थापन करताना घाबरून जाऊ नका. तुम्हाला माहीत आहे की, आर्थिक बाबतीत ओढाताण झाल्यामुळे
अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्या सोडविण्यासाठी कष्ट करा. धनु राशी भविष्य 2015
अनुसार शांत आणि स्थिर मनोवृत्तीच्या व्यक्ती हे साध्य करू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या
कुटुंबियांचा वागणुकीतही बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. या बदलामुळे तुम्ही व्यथित
होऊ शकता. प्रत्येक दृष्टिकोनातून तुम्हाला खंबीर करायचे, असे या वर्षाने मनावर घेतल्यासारखे
वाटते. तुमच्यात असुरक्षिततेची भावना वाढीस लागेल, त्याचा तुमच्या प्रकृतीवरही परिणाम
होईल. प्रेमप्रकरणांमध्येही फारसे समाधान लाभणार नाही. पण लक्षात ठेवा, जे होते, ते
चांगल्यासाठीच होते. दुसऱ्या बाजूला 2015 सालाच्या उत्तरार्धात तुमच्या सगळ्या इच्छा
पूर्ण होऊ लागतील. तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद निर्माण होईल. आर्थिक उत्पन्नात
वाढ होईल आणि विद्यार्थ्यांना अनुकूल निकाल मिळतील. हे वर्ष म्हणजे तुमच्यासाठी साहसी
प्रवासच असणार आहे!
धनु राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करायवायचे उपाय : देवळात तूप आणि बटाटा दान करा.
मकर राशी भविष्य 2015
मकर राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालातील पहिले सहा
महिने उत्तम असतील. तुमच्या अचूक योजनांचे फळ या काळात तुम्हाला मिळेल. तुम्ही बुद्धिमान
आहात. तुमच्या राहत्या जागी कार्यक्रमांची रेलचेल राहील. कामाच्या ठिकाणी सर्व काही
सकारात्मक राहील. हा तुमच्यासाठी जल्लोष साजरा करण्याचा काळ आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक
राहील. तुम्हाला सगळीकडूनच सहकार्याचा हात मिळेल. तुमचे लग्नाचे वय झाले असेल तर 2015
सालात या बाबतीत काही सकारात्मक घडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी
खूपच अनुकूल आहे. त्यांचे प्रयत्न निश्चित यशस्वी होणार आहेत. असे असले तरी 2015 सालातील
उत्तरार्ध मात्र काहीसा कठीण असेल. त्यावेळी गुरू तुमच्या आठव्या घरात असेल. परिणामी,
आर्थिक समस्या उद्भवतील. त्यामुळे काहीही करताना विचारपूर्वक पावले उचलण्याची आवश्यकता
आहे. पण काळजी करू नका, अशा प्रकारचे गंभीर परिस्थिती उद्भवल्यावर तुम्ही सक्षमपणे
तिचा सामना कसा करता हे चाचपण्याचा हा काळ आहे. त्याचप्रमाणे 2015 या वर्षात कोणत्याही
ठिकाणी गुंतवणूक करताना दोन वेळा विचार करावा, असे ही कुंडली सांगते.
मकर राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करावयाचे उपाय: दर चार महिन्यांनी शेंडी असलेले नारळ वाहत्या पाण्यात सोडा.
कुंभ राशी भविष्य 2015
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष समिश्र घटनांचे
राहील. 2015 या वर्षाच्या कुंभ राशीच्या कुंडलीनुसार तुमच्या जवळच्या व्यक्तींशी तुमचे
संबंध काहीसे ताणलेले राहतील. पण लगेचच त्याने व्यथित होऊ नका, कारण जे काही होते ते
चांगल्यासाठीच होते. तुमची काहीशी फटकळ भाषा हे त्यासाठीच एक कारण असू शकेल. त्यामुळे
शक्य तितके विनम्रपणे वागा. कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे काहीसे
तणावाखाली राहाल. पण खूप काळजी करण्याचे कारण नाही, कारण ही काळ पटकन निघून जाईल. तुम्ही
कोर्टाकचेरीमध्ये व्यस्त राहाल. पण काळजी करण्याचे कारण नाही, कारण तुम्ही विरोधकांना
नेस्तनाभूत कराल. या वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये जवळीक निर्माण
होईल. वैवाहिक आयुष्य आनंदी असेल. तुम्हाला स्वर्ग केवळ दोन बोटे शिल्लक असेल. कामाच्या
ठिकाणीसुद्धा सुधारणा होतील. ही जल्लोष करण्याची वेळ असेल. आर्थिक उत्पन्न आणि शिक्षण
यात वाढ होईल. या कालावधीत तुम्ही सगळ्याच बाबतीत सक्रिय असाल.
कुंभ राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करावयाचे उपाय: देवळातील भटजींना पिवळ्या रंगाचे कपडे दान करा.
मीन राशी भविष्य 2015
मीन राशीच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष उत्तम प्रकारे
सुरू होईल. मीन राशी भविष्य 2015 अनुसार या वर्षात तुमच्या घरी धार्मिक शुभकार्य पार
पडेल. तुमच्या घरी समारंभ साजरे करण्याचा हा काळ आहे. असे असेल तरी एखाद्या कौटुंबिक
सदस्याच्या उद्धट वागणुकीचा तुम्हाला त्रास होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करा, असा माझा
तुम्हाला सल्ला राहील. केतूचा प्रभाव वाढता राहिल्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची
गरज आहे. अशा वेळी तुमच्या आहाराच्या सवयींवर लक्ष ठेवणे आवश्यक राहील. मीन राशीची
कुंडली सांगते की, या काळात तुम्ही काळजीपूर्वक वाहन चालवा. प्रेम प्रकरणांसाठी हा
कालावधी अनुकूल आहे. पण सातव्या घरात असलेला राहू हे फार चांगले चिन्ह नाही. त्यामुळे
प्रेम आणि विश्वास हे दोन घटक नेहमीच अत्यंत महत्त्वाचे राहतील. तुम्हाला चांगली नोकरी
मिळू शकेल. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. असे असले तरी कष्ट आणि
जबाबदारी यात वाढ होईल. त्यामुळे तयार राहा. त्याचप्रमाणे या वर्षात तुम्हाला आर्थिक
लाभ, पगारवाढ होण्याची शक्यता आहे. अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे,
त्यामुळे हा जल्लोष करण्याचा काळ आहे. शिक्षणासाठी हा अत्यंत अनुकूल असेल, पण 2015च्या
उत्तरार्धात काही समस्या उद्भवू शकतात.
मीन राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करावयाचे उपाय: देवळात तांदूळ, गूळ आणि मसूर यांचे दान करा.
- पं. हनुमान मिश्रा
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2023
- राशिफल 2023
- Calendar 2023
- Holidays 2023
- Chinese Horoscope 2023
- Education Horoscope 2023
- Purnima 2023
- Amavasya 2023
- Shubh Muhurat 2023
- Marriage Muhurat 2023
- Chinese Calendar 2023
- Bank Holidays 2023
- राशि भविष्य 2023 - Rashi Bhavishya 2023 Marathi
- ராசி பலன் 2023 - Rasi Palan 2023 Tamil
- వార్షిక రాశి ఫలాలు 2023 - Rasi Phalalu 2023 Telugu
- રાશિફળ 2023 - Rashifad 2023
- ജാതകം 2023 - Jathakam 2023 Malayalam
- ৰাশিফল 2023 - Rashifal 2023 Assamese
- ରାଶିଫଳ 2023 - Rashiphala 2023 Odia
- রাশিফল 2023 - Rashifol 2023 Bengali
- ವಾರ್ಷಿಕ ರಾಶಿ ಭವಿಷ್ಯ 2023 - Rashi Bhavishya 2023 Kannada